तरतूद १० कोटींची, मिळाले केवळ अडीच कोटी

By admin | Published: October 14, 2016 02:46 AM2016-10-14T02:46:08+5:302016-10-14T02:46:08+5:30

‘प्रधानमंत्री कृषी सिंचाई’ योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सूक्ष्म सिंचन योजनेकरिता वाशिम जिल्ह्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद केलेली असतानाही कृषी विभागाला केवळ अडीच कोटी

The provision was 10 crores, only two and a half crore got | तरतूद १० कोटींची, मिळाले केवळ अडीच कोटी

तरतूद १० कोटींची, मिळाले केवळ अडीच कोटी

Next

वाशिम : ‘प्रधानमंत्री कृषी सिंचाई’ योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सूक्ष्म सिंचन योजनेकरिता वाशिम जिल्ह्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद केलेली असतानाही कृषी विभागाला केवळ अडीच कोटी रुपयेच प्राप्त झाले आहेत. उर्वरित अनुदान लवकरच प्राप्त न झाल्यास जिल्ह्यातील हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार असल्याचे चित्र आहे. वाशिम जिल्ह्यात यंदा एकू ण ११ हजार ३७६ शेतकऱ्यांनी आॅनलाइन अर्ज सादर केले. त्यात ठिबकसाठी १ हजार ९५२; तर तुषार संचाकरिता ९ हजार ४२४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. शासनाने जिल्ह्यासाठी सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत
ठिबक आणि तुषार सिंचनासाठी १० कोटी २ लाख रुपयांची तरतूद केली आहे. आतापर्यंत केवळ २ कोटी ६१ लाख रुपये आॅनलाइन प्राप्त झाले असून, अनुदानाच्या आधारे शेतकऱ्यांना पूर्वसंमती दिली जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The provision was 10 crores, only two and a half crore got

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.