अडसर ठरणाऱ्या फांद्यांची कटाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:40 AM2021-04-06T04:40:32+5:302021-04-06T04:40:32+5:30

00000000000 मालेगाव तालुक्यात आणखी सहा बाधित जऊळका रेल्वे : आरोग्य विभागाकडून सोमवारी प्राप्त अहवालानुसार, मालेगाव तालुक्यातील आणखी सहा व्यक्तींना ...

Pruning of obstacles | अडसर ठरणाऱ्या फांद्यांची कटाई

अडसर ठरणाऱ्या फांद्यांची कटाई

googlenewsNext

00000000000

मालेगाव तालुक्यात आणखी सहा बाधित

जऊळका रेल्वे : आरोग्य विभागाकडून सोमवारी प्राप्त अहवालानुसार, मालेगाव तालुक्यातील आणखी सहा व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. बाधितांमध्ये तालुक्यातील ग्रामीण भागातील व्यक्तींचे प्रमाण अधिक आहे.

00000000000

पोलिसांकडून वाहनांची तपासणी

पोहरादेवी : यवतमाळ जिल्ह्यातून येणारे वाहनचालक नियमांचे उल्लंघन करीत असल्याचा प्रकार मानोरा पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर, पोलिसांनी गत आठवड्यापासून पोहरादेवी परिसरातील मार्गावर वाहनांची तपासणी सुरू केली आहे. यात शुक्रवार ते रविवारदरम्यान १५ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

0000000000000

कोरोना जनजागृतीसाठी कार्यशाळा

शेंदुरजना आढाव : येथून जवळच असलेल्या हिवरा खु. येथे प्रशासनाच्या मार्गदर्शनात कोरोनाविषयक जनजागृतीसाठी कार्यशाळा घेण्यात येत आहे. यात सरपंच, उपसरपंच यांच्यासह ग्रामसचिवांच्या उपस्थितीत आरोग्य पथकाकडून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले जात आहे.

000000000000

समित्यांना सतर्क राहण्याचे आवाहन

वाशिम : बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यातील ७०० गावांमध्ये बाल संरक्षक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. गावात किंवा परिसरात कुठेही बालविवाह होत असल्यास तो रोखण्यासाठी समितीमधील सदस्यांनी पुढे यायला हवे. सदस्यांनी नियमित सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुभाष राठोड यांनी केले आहे.

000000000000

Web Title: Pruning of obstacles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.