प्रकल्पाच्या भिंतीवरील झाडांची कापणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:34 AM2021-01-09T04:34:14+5:302021-01-09T04:34:14+5:30

------------------ हवामान यंत्राची सुरक्षा वा-यावर कामरगाव: सुमारे चार वर्षांपूर्वी शेतक-यांना हवामानाची माहिती देण्यासाठी कामरगाव शिवारात स्कायमेट कंपनीच्यावतीने स्वयंचलित ...

Pruning of trees on the project wall | प्रकल्पाच्या भिंतीवरील झाडांची कापणी

प्रकल्पाच्या भिंतीवरील झाडांची कापणी

Next

------------------

हवामान यंत्राची सुरक्षा वा-यावर

कामरगाव: सुमारे चार वर्षांपूर्वी शेतक-यांना हवामानाची माहिती देण्यासाठी कामरगाव शिवारात स्कायमेट कंपनीच्यावतीने स्वयंचलित हवामान यंत्र स्थापित करण्यात आले; परंतु हे यंत्र नादुरुस्त झाले आहे, शिवाय या यंत्राच्या सभोवताल लावलेल्या कुंपणाची अवस्थाही वाईट झाली आहे. त्यामुळे या यंत्राची सुरक्षा धोक्यात आली आहे.

----------

गटशेतीबाबत शेतक-यांना मार्गदर्शन

धनज बु. : कृषी विभागाकडून शेतक-यांना गटशेतीकडे वळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अंतर्गत गावागावात मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात येत आहे.

शेतक-यांनी शेतीचे अर्थशास्त्र समजून घेऊन गट शेतीची कास धरणे काळाची गरज असून, शेतक-यांनी गटशेतीचा आधार घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. एम. तोटावार यांनी शुक्रवारी केले.

-------

पशू दवाखान्यातील पदे रिक्त

रिठद: परिसरातील पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत रिक्त पदामुळे परिसरातील पशुपालकांना गुरांवर उपचार करण्यात अडचणी येत आहेत. हिवाळ्याच्या दिवसांत नियमित अधिकारीही नसल्याने पशूपालक त्रस्त झाले आहेत. याची दखल जिल्हा पशुसंवर्धन अधिका-यांनी घेऊन रिक्त पदे भरावीत, अशी मागणी पशुपालक करीत आहेत.

--------

कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित

जऊळका रेल्वे: गत काही दिवसांपासून मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे परिसरातील गावांत कृषी पंपांच्या वीज पुरवठ्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. त्यामुळे रब्बी पिकांच्या सिंचनात अडथळा निर्माण होत आहे. गुरुवारी रात्रीही परिसरातील कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित झाल्याने शेतक-यांना रात्रभर जागून काढावी लागली.

===Photopath===

080121\08wsm_8_08012021_35.jpg

===Caption===

प्रकल्पाच्या भिंतीवरील झाडांची कापणी

Web Title: Pruning of trees on the project wall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.