मानसीक आरोग्य दिन कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 07:39 PM2017-10-13T19:39:06+5:302017-10-13T19:40:10+5:30

रामराव सरनाईक समाजकार्य विद्यालय येथे जागतिक मानसीक आरोग्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम कामाच्या ठिकाणी मानसीक आरोग्य या घोषवाक्याखाली या सप्ताहाचे  उद्घाटन केले. प्रमुख दिपाली देशमुख यांच्या या मानसीक आरोग्य दिन हा कार्यक्रम आयोजित केला.

Psychic Health Day Program | मानसीक आरोग्य दिन कार्यक्रम

मानसीक आरोग्य दिन कार्यक्रम

Next
ठळक मुद्देसमाजकार्य महाविद्यालय मान्यवरांचे मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : स्थानिक  रामराव सरनाईक समाजकार्य विद्यालय येथे जागतिक मानसीक आरोग्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम कामाच्या ठिकाणी मानसीक आरोग्य या घोषवाक्याखाली या सप्ताहाचे  उद्घाटन केले. प्रमुख दिपाली देशमुख यांच्या या मानसीक आरोग्य दिन हा कार्यक्रम आयोजित केला.  या कार्यक्रमाला  सामान्य रुग्णालय वाशिमचे मानसोपचार तज्ञ डॉ. मंगेश भाग्यवंत प्रमुख मार्गदर्शक म्हणुन उपस्थित होते.  तर प्रमुख उपस्थिती म्हणून समुपदेशक डॉ.पल्लवी गायकवाड या उपस्थित होत्या थोर पुरुष  संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुजन करुन कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.  प्रा.दिपाली देशमुख यांनी प्रास्ताविक  मांडतांना सांगितले की, आजची धकाधकीच्या जवीनात  व्यक्ती हा आपली जीवन जगण्याची पध्दत बदलत चालल आहे व यातुन त्यांच्या मानसीक आरोग्यावर फार मोठा परिणाम होत आहे. तसेच डॉ.पल्लवी यांनी सुध्दा मानसीक आरोग्य जपणे गरजेचे आहे.प्रत्येकाने  ते जपावे तसेच प्रमुख मार्गदर्शक  डॉ.मंगेश  भागवंत यांनी मानसीक आरोग्य बदल प्रत्येक व्यक्ती हा जागृत असणे गरजेचे आहे. व आजची जीवन  पध्दत ही तणाव ग्रस्त पध्दतीत जगली जात आहे. जीवन जगण्याचा पध्दतीमुळे  व्यक्ती हा मानसीक आरोग्य बिघडतो तर या तणावातुन वर येवुन तणावमुक्त  जीवन जगा म्हणजे मानसीक आरोग्य सुधारेल असे त्यांनी सांगितले. यावेळी प्राचार्य निलेश देशमुख, यांनी सुध्द मत व्यक्त् केले. संचालन आकाश गोटे यांनी तर आभार गिंताजली चव्हाण हिने केले. 
 

Web Title: Psychic Health Day Program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.