पं. स.च्या शिरपूर भाग-२ पोटनिवडणुकीसाठी इच्छुकांची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:27 AM2021-06-26T04:27:59+5:302021-06-26T04:27:59+5:30
सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील ओबीसी आरक्षणाविषयीची याचिका निकाली काढली आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषद व पंचायत ...
सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील ओबीसी आरक्षणाविषयीची याचिका निकाली काढली आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील ओबीसी सदस्यांचे पद रिक्त झाले. सर्वोच्च न्यायालयाने रिक्त जागांवर निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार निवडणूक आयोगाने राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुका घोषित केल्या. या कार्यक्रमात १९ जुलै रोजी शिरपूर येथील भाग-२ मध्ये पंचायत समिती गणाची निवडणूक होणार आहे. पूर्वी ही जागा ओबीसी महिलांसाठी राखीव होती. आता ही जागा सर्वसाधारण (खुल्या) प्रवर्गासाठी असल्याने निवडणुकीत अधिक चुरस पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीत ३४०० पुरुष मतदार, तर २९८२ स्त्री मतदार, असे एकूण ६३८२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीसाठी तयार केलेल्या याद्या मालेगाव पंचायत समितीच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.