इंग्लंडचा अभ्यासदौरा आटोपून लोकलेखा समिती नेदरलँडमध्ये मध्ये दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 12:29 PM2018-09-09T12:29:39+5:302018-09-09T12:31:18+5:30
वाशिम : महाराष्ट्र विधिमंडाळाची लोकलेखा समिती इंग्लंडचा अभ्यास आटोपून ८ सप्टेंबरला नेदरलँडमध्ये दाखल झाली.
समितीत आमदार पाटणी यांचा समावेश : इग्लंडच्या शासनप्रणालीचा अभ्यास
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महाराष्ट्र विधिमंडाळाची लोकलेखा समिती इंग्लंडचा अभ्यास आटोपून ८ सप्टेंबरला नेदरलँडमध्ये दाखल झाली. या समितीत उत्कृष्ट संसदपटू म्हणून लौकिक असणारे आमदार राजेंद्र पाटणी यांचा समावेश असून, इंग्लंडमध्ये सदर समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील जगविख्यात स्मारक, भारत भवन, ब्रिटिश संसदेचे हाऊस आॅफ कॉमन्स, हाऊस आॅफ लॉर्ड आदी ठिकाणांना भेटी देत शासन प्रणालीचा अभ्यास केला.
विधिमंडळाच्या लोकलेखा समितीत दोन्ही सभागृहातील निवडक अभ्यासू आमदारांचा समावेश आहे. आमदार राजेंद्र पाटणी हे सदर समितीचे प्रतिनिधित्व करीत आहेत. यावर्षी सदर समिती विदेशाच्या अभ्यास दौºयावर गेली आहे. समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील जगविख्यात स्मारक व संग्रहालयाला भेट दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सन १९२१ व १९२२ असे दोन वर्षे लंडनमध्ये वास्तव्यास होते. या समितीने लंडनमधील भारताचे ‘इंडिया हाऊस’ येथे उच्चायोगाला भेट दिली व भारताचे उच्चायुक्त वाय. के. सिन्हा यांच्यासमवेत चर्चा केली.
ब्रिटीश संसदेच्या हाउस आॅफ कॉमन्स (लोकसभा) तथा हाऊस आॅफ लॉर्डला भेट दिली. यावेळी समितीमधील आमदारांनी ब्रिटीश लोकसभा अध्यक्ष तसेच ब्रिटीश खासदारांसोबत लंडन मधील संसदेची इमारत असलेल्या वेस्टमिन्स्टर राजवाडा येथील बैठकीत चर्चा केली. त्यानंतर समितीने इंग्लंडच्या लोकलेखा समिती पदाधिकाºयांसोबत चर्चा केली. इंग्लंडच्या राणीचा जगविख्यात बंगला बॅकिंगहॅम पॅलेसला भेट देवून समितीने इग्लंडचा निरोप घेतला.
विधीमंडळाच्या लोकलेखा समितीचे प्रतिनिधी म्हणून इग्लंडच्या शासन प्रणालीचा सखोल अभ्यास करण्याची संधी मिळाली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट देता आली. या अभ्यासाचा भविष्यात विकासात्मक कामे करताना निश्चिततच फायदा होईल.
- राजेंद्र पाटणी
आमदार, कारंजा विधानसभा मतदारसंघ