पोळ्याच्या सणातून ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’बाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 08:08 PM2017-08-22T20:08:32+5:302017-08-22T20:08:53+5:30
वाशिम: शासनाच्या बेटी बचाओ, बेटी पढाओओ’ अभियानाच्या प्रचार, प्रसारात हातभार लावण्यासाठी आता शेतकरीही सरसावले आहेत. याचा प्रत्यय पोळ्याच्या दिवशी आला. तालुक्यातील गोंडेगाव येथे शेतकºयांनी बैल सजविताना त्यावर बेटी बचाओ, बेटी पढाओचा संदेश देणारे घोषवाक्य लिहिले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क

शेतकºयांसाठी महत्त्वाचा असलेला सण म्हणजे पोळा, या सणानिमित्त गोंडेगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांनी आगळाच उपक्रम राबवलिा. या ठिकाणी पोळा सणाचे औचित्य साधून ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियानाची जनजागृती करण्यात आली. गोंडेगाव येथील प्रगतशील शेतकरी डॉ. चौधरी यांनीआपले बैल सजविताला त्यांच्या पाठीवर शासनाच्या ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’, ‘स्वच्छ भारत अभियान’ आदी, महत्त्वपूर्ण अभियानांबाबतचे बॅनर बैलांच्या पाठिवर लावत. शासनाच्या उपक्रमाचा आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्रचार व प्रसार करून जनजागृृती करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला. डॉ. चौधरी यांच्याशिवाय येथील काही शेतकºयांनी बैलांच्या पाठीवर जनजागृतीपर संदेशही लिहिले होते.