वाशिम जिल्ह्यात ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’संदर्भात जनजागृती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 10:31 PM2017-10-22T22:31:45+5:302017-10-22T22:33:01+5:30
वाशिम : स्त्री-पुरूष लिंगगुणोत्तरातील तफावत कमी करणे आणि मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यात महिला व बालकल्याण विभागातर्फे जनजागृती सुरू असून, घरांवर स्टिकर लावले जात आहेत. सोबतच ‘कन्यारत्न’ जन्मताच जिल्हा प्रशासनातर्फे माता-पित्यांचे अभिनंदन केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : स्त्री-पुरूष लिंगगुणोत्तरातील तफावत कमी करणे आणि मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यात महिला व बालकल्याण विभागातर्फे जनजागृती सुरू असून, घरांवर स्टिकर लावले जात आहेत. सोबतच ‘कन्यारत्न’ जन्मताच जिल्हा प्रशासनातर्फे माता-पित्यांचे अभिनंदन केले जात आहे.
विविध कारणांमुळे स्त्री-पुरुष लिंगगुणोत्तरात तफावत निर्माण होत आहे. यातूनच स्त्री भ्रूण हत्या, लिंग निवड चाचणी आदी प्रकार घडत असल्याने यावर प्रभावी उपाययोजना म्हणून केंद्र सरकारने ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियान २१ फेब्रुवारी २०१५ पासून देशातील १०० जिल्ह्यांत सुरू असून, यासाठी १०० टक्के निधीची हमी केंद्र शासनाने घेतली आहे. या अभियानात महाराष्ट्रातील बुलडाणा, वाशिम, बीड, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, उस्मानाबाद, सांगली, जालना यासह १६ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. या अभियानात समाविष्ठ असलेल्या जिल्ह्यात लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत खात्री देणे, मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षिततेबाबत खात्री देणे, स्त्री-पुरुष लिंगगुणोत्तरातील तफावत कमी करणे यासह अन्य उद्दिष्ट साध्य करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवण्यात आले. या अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यात जनजागृती म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडनीस, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बालकल्याण विभागाने जनजागृती सुरू केली आहे. घरांवर स्टिकर लावणे, कन्यारत्न प्राप्त होताच माता-पित्यांचे अभिनंदन करणे, मुलींच्या शिक्षणाबद्दल पालकांना माहिती देणे आदी उपक्रम राबविले जात आहेत. यापुढेही बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियानांतर्गत जनजागृतीपर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यासाठी जिल्हा समन्वयक रुपेश निमके यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळा प्रशासन, बालविकास प्रकल्प अधिकाºयांनी पुढाकार घेतला आहे.