स्वच्छता ही सेवा उपक्रमाबाबत जनजागृती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 02:07 PM2018-09-30T14:07:36+5:302018-09-30T14:08:07+5:30

शिरपूर जैन (वाशिम) : परिसरातील तिवळी येथील ग्रामपंचायतच्यावतीने श्री विठ्ठल महाराज विद्यालय व श्री सीताराम महाराज कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमांतर्गत जनजागृती करण्यात आली.

Public awareness about the cleanliness service program | स्वच्छता ही सेवा उपक्रमाबाबत जनजागृती 

स्वच्छता ही सेवा उपक्रमाबाबत जनजागृती 

googlenewsNext

 
लोकमत न्यूज नेटवर्क 
शिरपूर जैन (वाशिम) : परिसरातील तिवळी येथील ग्रामपंचायतच्यावतीने श्री विठ्ठल महाराज विद्यालय व श्री सीताराम महाराज कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमांतर्गत जनजागृती करण्यात आली. यावेळी गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले आणि गावकºयांसह विद्यार्थी, शिक्षकांना स्वच्छतेची शपथही देण्यात आला. 
शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत १५ सप्टेंबरपासून स्वच्छता पंधरवाडा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत तिवळी येथील श्री विठ्ठल महाराज विद्यालय व श्री सीताराम महाराज कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने स्वच्छता मोहिम राबवून जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाच्या सुरवातीला सरपंच वर्षा गजानन लहाने यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर गावकरी, शिक्षक व विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. मालेगाव तालुका स्वच्छता समन्वयक सुखदेव पडघान यांनी सर्वांना शपथ दिली. त्यांनी गावकºयांना शौचालयाचा नियमित वापर करण्याचे आवाहन केले. त्यानंतर संपूर्ण गावातून स्वच्छता रॅली काढण्यात आली आणि या रॅली दरम्यान गावात स्वच्छता करण्यात आली. या कार्यक्रमाला उपसरपंच भागवत बकाल, ग्रामसेवक बी.डब्ल्यू. सोमटकर, भागवत लहाने, स्वच्छता समन्वयक बाळू इंगोले, राजू भिवरकर, कैलास लहाने, पुरुषोत्तम लहाने, विजय अदमने, निर्मला गिºहे, गजानन लहाने, रामकिसन गवळी, अन्सार खाँ पठाण, कमला कांबळे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. संतोष गिºहे, भगवान बकाल, गजानन भिसडे, मनोहर शेळकेसह सर्वशिक्षक, विद्यार्थी गावातील बहुसंख्य ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Web Title: Public awareness about the cleanliness service program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.