२०८ मतदार केंद्रांत ‘ईव्हीएम, व्हीव्हीपॅट’संदर्भात जनजागृती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 03:02 PM2018-12-30T15:02:52+5:302018-12-30T15:03:25+5:30
वाशिम : निवडणूक प्रक्रियेत मतदानासाठी वापरण्यात येणाºया ‘ईव्हीएम’बाबत कोणतीही साशंकता, शंका आणि संभ्रम राहू नये म्हणून ‘व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम’संदर्भात वाशिम तालुक्यातील २०८ मतदान केंद्रांत जनजागृतीपर मोहिम हाती घेण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : निवडणूक प्रक्रियेत मतदानासाठी वापरण्यात येणाºया ‘ईव्हीएम’बाबत कोणतीही साशंकता, शंका आणि संभ्रम राहू नये म्हणून ‘व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम’संदर्भात वाशिम तालुक्यातील २०८ मतदान केंद्रांत जनजागृतीपर मोहिम हाती घेण्यात आली आहे. या दोन्ही मशीनच्या माध्यमातून मतदानाची प्रात्यक्षिके दाखवून आणि याबाबत योग्य माहिती देवून मतदारांमध्ये विश्वास निर्माण करा, अशा सूचना तहसिलदार बळवंत अरखराव यांनी दिल्या.
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून मतदानाची प्रात्यक्षिके सादर करतांना ग्रामस्थांच्या शंकांचे समाधान करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. जनजागृती मोहिमेदरम्यान ज्या पथकांना जी वाहने देण्यात आली आहेत, त्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा लावली जाणार आहे. कोणत्या मार्गाने हे वाहन जात आहे व सद्यस्थितीस कोणत्या गावात आहे, याची माहिती देखील उपलब्ध होणार आहे. जनजागृती मोहिमेदरम्यान प्रत्येक मतदाराला मतदान कसे करायचे, याबाबतचे प्रात्यक्षिक करून दाखविले जात आहे. व्हीव्हीपॅट या यंत्रामुळे आपण कोणाला मतदान केले आहे, हे मतदाराला व्हीव्हीपॅट यंत्राच्या माध्यमातून दिसणार आहे. वाशिम शहरासह ग्रामीण भागातही मतदान केंद्रनिहाय ‘व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम’संदर्भात जनजागृती केली जात आहे. प्रात्यक्षिके दाखवून मतदारांच्या शंकांचे निरसन केले जात आहे, असे तहसिलदार बळवंत अरखराव, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार दीपक दंडे यांनी सांगितले.