चिमुकल्यांची प्लास्टिक पिशव्या न वापरण्याबाबत जनजागृती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 01:58 PM2017-09-28T13:58:47+5:302017-09-28T14:00:29+5:30

Public awareness about not using sparrows for plastic bags! | चिमुकल्यांची प्लास्टिक पिशव्या न वापरण्याबाबत जनजागृती!

चिमुकल्यांची प्लास्टिक पिशव्या न वापरण्याबाबत जनजागृती!

Next
ठळक मुद्देहरित ग्राहक दिन : एसएमसीच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम
शिम  : स्थानिक एस.एम.सी. विद्यालयातील राष्टÑीय हरित सेनेच्या चिमुकल्यांनी २८ सप्टेंबर हरित ग्राहक दिनी बाजारात फिरुन प्लास्टिक पिशव्या न वापरण्याबाबत ग्राहकांसह दुकानदारांमध्ये जनजागृती केली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या गोड आवाजात प्लास्टिकमुळे होणाºया हाणीबाबत राष्टÑीय हरित सेनेचे शिक्षक यांच्या मार्गदर्शनात व इको क्लब विद्यार्थ्यांच्या सहकार्याने जनजागृती केली.२८ सप्टेंबर हा दिवस हरित ग्राहक दिन म्हणून संबोधला जातो. हरित ग्राहक ही संकल्पना पाश्चिमात्य देशात रुढ झाली असली तरी भारतामध्ये ती नविन नाही. गेल्या काही वर्षामध्ये ग्राहकवादाची वाढ झपाटयाने झाली आहे. गरजेचा विचार न करता केली जाणारी खरेदी अशी ग्राहकवादाची सोपी व्याख्या करता येईल.  शॉपिंगला जाणे हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. वाढत्या ग्राहकवादामुळे आपल्याला बºयाच समस्यांना तोंड दयावे लागत आहे त्याचा विचार होणे गरजेचे आहे. वाढता घनकचरा व व्यवस्थापन, उत्पादन प्रक्रीयेतून होणारे प्रदूषण यावर मार्गदर्शन करीत राष्टÑीय हरित सेना व इको क्लबच्यावतिने  अभिजित जोशी े  यांच्या मार्गदर्शनात  वाशिम शहरात कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.  ग्राहकांना प्लास्टीकच्या पिशव्या वापर न करता कापडी पिशव्यांचा वापर करण्याचा आग्रह करण्यात आला. या चिमुकल्यांच्या आवाहानाने शहरातील चौक गजबजून गेले होते.

Web Title: Public awareness about not using sparrows for plastic bags!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.