‘जलदूत’ करणार पाण्याच्या वापराविषयी जनजागृती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 04:11 PM2018-05-16T16:11:08+5:302018-05-16T16:11:08+5:30

जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर १२ असे एकूण ६० जलदुतांची निवड केली जाणार असून, २१ मे पर्यंत इच्छूक उमेदवारांकडून जिल्हा प्रशासनातर्फे अर्ज मागविण्यात आले आहेत.

Public awareness about the use of water | ‘जलदूत’ करणार पाण्याच्या वापराविषयी जनजागृती !

‘जलदूत’ करणार पाण्याच्या वापराविषयी जनजागृती !

Next
ठळक मुद्देपाण्याचा वापर काटकसरीने व नियोजनपुर्वक कसा करावा, यासंदर्भात जलदुतांमार्फत जनजागृती केली जाणार आहे. तालुका स्तरावर प्रत्येक तालुक्यात १२ जलदूतांची निवड केली जाणार आहे.   जलदूत पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा संबंधित तालुक्याचा रहिवाशी असावा व किमान १२ वी किंवा पदविका उत्तीर्ण असावा.

वाशिम : वाढती लोकसंख्या, वाढते उद्योग व अनियमित पर्जन्यमान यामुळे भविष्यात उपलब्ध पाण्यावरील ताण आणखी वाढण्याची शक्यता आहे. उपलब्ध पाणी सर्व वापरकर्त्यांना त्यांच्या गरजेच्या प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी पाण्याचा वापर काटकसरीने व नियोजनपुर्वक कसा करावा, यासंदर्भात जलदुतांमार्फत जनजागृती केली जाणार आहे. यासाठी वाशिम जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर १२ असे एकूण ६० जलदुतांची निवड केली जाणार असून, २१ मे पर्यंत इच्छूक उमेदवारांकडून जिल्हा प्रशासनातर्फे अर्ज मागविण्यात आले आहेत.

विविध कारणांमुळे उपलब्ध पाण्याची कमतरता जाणवत आहे. समाजात जलजागृती व जलसाक्षरता निर्माण होण्याची गरज असून, वाशिम जिल्ह्यात तालुका स्तरावरील जलदूतांची निवड करून जनजागृती केली जाणार आहे. तालुका स्तरावर प्रत्येक तालुक्यात १२ जलदूतांची निवड केली जाणार आहे.  जलदूत पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा संबंधित तालुक्याचा रहिवाशी असावा व किमान १२ वी किंवा पदविका उत्तीर्ण असावा. संगणकीय ज्ञान आवश्यक. तसेच प्रवास, सुक्ष्म निरिक्षण व निरिक्षणाचे विश्लेषन तसेच निष्कर्षात्मक मांडणी करण्याची आवड व कौशल्य असावे. जलविषयक शासकीय, अशासकीय किंवा समाजसेवी संस्थांशी संबंधित प्रशिक्षक असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. जलसंधारणाबाबत पुरेसे ज्ञान असावे. निवडीमध्ये महिलांनादेखील प्राधान्य दिले जाईल. अर्ज करण्यासंदर्भात अधिक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे जलसंपदा विभागाने कळविले.

Web Title: Public awareness about the use of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.