पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जनजागृती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 01:14 AM2017-10-12T01:14:50+5:302017-10-12T01:16:00+5:30
वाशिम: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या जिल्ह्यातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून पाणी पुरविले जाते. दरम्यान, अपुर्या पर्जन्यमानामुळे यंदा प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणी शिल्लक असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत ‘मजिप्रा’कडून गावागावात प्रभावीरीत्या जनजागृती केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत जिल्ह्यातील बंद पडलेल्या १0 पाणी पुरवठा योजनांच्या पुनरूज्जीवनासाठी भरीव निधी मंजूर झाला. त्यातून सध्या प्रथम प्राधान्याने योजना पूर्ण करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. यासोबतच ज्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुस्थितीत आहेत, त्याद्वारे ग्रामीण जनतेला पाणी पुरवठा केला जात असून, गरज असेल तरच पाणी घ्या, पाण्याचा अपव्यय टाळा, गावातील विहिरी, हातपंपांना पाणी असल्यास आधी त्याचा वापर करा, अशा पद्धतीने ‘मजि प्रा’कडून जिल्ह्यातील गावकर्यांचे उद्बोधन केले जात असून त्यास सर्वच स्तरातून प्रतिसाद मिळत आहे.
यावर्षी पर्जन्यमान असमाधानकारक राहिल्याने सद्य:स्थितीत जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांच्या पाणीपातळीने निच्चांकी स्तर गाठला आहे. ही बाब लक्षात घेऊन आतापासूनच पाणी पुरवठय़ाचे चोख नियोजन केले जात असून, गावागावात प्रभावीरीत्या जनजागृती केली जात आहे. गावकर्यांमधून देखील त्यास प्रतिसाद मिळत आहे.
- के. के. जीवने
कार्यकारी अभियंता, मजिप्रा.