विविध योजनांविषयी जनजागृती मोहिमेस रथाद्वारे प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:18 AM2021-03-04T05:18:53+5:302021-03-04T05:18:53+5:30
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता ...
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज, ‘माविम’चे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे, माहिती सहाय्यक तानाजी घोलप यांची प्रमुख उपस्थिती होती. या चित्ररथाद्वारे सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य व अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचा पुरवठा करणे आदी योजनांवर आधारित ऑडिओ-व्हिडीओ जिंगल्ससह जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीवर आधारित ‘दिशा परिवर्तनाची’ हा माहितीपट दाखविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागांमध्ये हा डिजिटल चित्ररथ जाणार असून आपल्या परिसरात, गावामध्ये हा चित्ररथ आल्यानंतर नागरिकांनी सामाजिक अंतर ठेवून या चित्ररथाच्या माध्यमातून योजनांची माहिती जाणून घ्यावी. तसेच पात्र लाभार्थ्यांनी संबंधित विभागांशी संपर्क साधून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी खडसे यांनी केले आहे.