वाशिम जिल्ह्यातील कलापथकांना मिळणार जनजागृतीचे कार्यक्रम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 02:23 PM2017-12-15T14:23:05+5:302017-12-15T14:24:51+5:30
वाशिम : गत एक ते दीड वर्षांपासून कलापथकाच्या माध्यमातून शासकीय योजनांची प्रचार व प्रसिद्धी केली जात नसल्याने जिल्ह्यातील कलावंतांवर उपासमारीची वेळ आल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २७ नोव्हेंबरच्या अंकात प्रकाशित केले होते. याची दखल घेत आता जिल्हा प्रशासनाने कलापथकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी प्रस्ताव मागविले आहेत.

जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयांतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या योजना, विशेष घटक योजना व अन्य शासकीय योजनांविषयी वाशिम जिल्ह्यात सन २०१० ते २०१५ पर्यत कलापथकाचे जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले होते. परंतु दीड वषार्पासून हे कार्यक्रम जिल्हयात राबविले जात नसल्यामुळे कलावंतांची उपासमार होत आहे. इतर जिल्हयात हे कार्यक्रम राबविल्या जात आहेत. इतर जिल्हयात कार्यक्रम देण्यास बाहेरील जिल्हयातील कलावंतांना नाकारण्यात येत आहे. याबाबत संबंधित विभागात चौकशीदरम्यान निधी नसल्याचे कारण सांगण्यात येत होते. शासकीय योजनांसंदर्भात जनजागृतीपर कार्यक्रम मिळत नसल्याने सेवाभावी काम करणाºया लोककलावंतांवर अन्याय होत आहे, अशी आपबिती लोककलावंतांनी जिल्हा प्रशासनाकडे मांडली होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने २७ नोव्हेंबरच्या अंकात वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. आता जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाने जिल्ह्यातील संभाव्य आपत्तीप्रवण रिसोड व वाशिम तालुक्यातील गावांमध्ये कलापथकाच्या माध्यमातून संभाव्य पूर, आग, वीज, अपघात, साथरोग, शितलहर, उष्मघात आदी संभाव्य आपत्तीबद्दल जनजागृती करण्यासाठी वाशिम जिल्हयातील कलापथक, संस्थांकडून २२ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव मागविले आहेत. वाशिम जिल्हयातील कलापथक, संस्थांंना प्राधान्य देण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.