क्षयरोग दिनानिमित्त वाशिममध्ये जनजागृती रॅली; पथनाट्याव्दारे समाजप्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 04:55 PM2018-03-24T16:55:29+5:302018-03-24T16:55:29+5:30
वाशिम : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सर्वसामान्य नागरिकांमध्ये क्षयरोगाविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्हा क्षयरोग कार्यालयाच्यावतीने २४ मार्च रोजी सकाळी ८ वाजता शहरातील मुख्य मार्गांवरून जनजागृती रॅली काढण्यात आली.
वाशिम : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सर्वसामान्य नागरिकांमध्ये क्षयरोगाविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्हा क्षयरोग कार्यालयाच्यावतीने २४ मार्च रोजी सकाळी ८ वाजता शहरातील मुख्य मार्गांवरून जनजागृती रॅली काढण्यात आली. त्यात विशेषत: शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. पथनाट्याव्दारेही क्षयरोगाविषयी समाजप्रबोधन करण्यात आले.
‘क्षयमुक्त जगासाठीचे शिलेदार होऊया, सारे मिळून नवा इतिहास घडवूया’, असा रॅलीदरम्यान देण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी रॅलीस हिरवी झेंडी दाखविली. जिल्हा सामान्य रुग्णालय, अकोला नाका, पाटणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्थानकमार्गे जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आल्यानंतर समारोप करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा क्षयरोग नियंत्रण सोसायटीचे अध्यक्ष दीपक कुमार मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस. के. जिरोणकर यांच्यासह आरोग्य विभागातील इतर अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करित आहेत.