मद्यपान विरोधी पंधरवडा अभियानअंतर्गत वाशिम शहरातून निघणार जनजागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 03:30 PM2017-12-20T15:30:39+5:302017-12-20T15:32:36+5:30

वाशिम - श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय वाशिम, राष्ट्रीय सेवा योजना व महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या संयुक्त सहकार्यातून ३१ डिसेंबरपर्यंत मद्यपान विरोधी पंधरवडा अभियान राबविले जात असून, २३ डिसेंबरला वाशिम शहरातून भव्य जनजागृतीपर रॅली काढली जाणार आहे. 

A public awareness rally will come from Washim city under anti-drinking fortnightly campaign | मद्यपान विरोधी पंधरवडा अभियानअंतर्गत वाशिम शहरातून निघणार जनजागृती रॅली

मद्यपान विरोधी पंधरवडा अभियानअंतर्गत वाशिम शहरातून निघणार जनजागृती रॅली

Next
ठळक मुद्देश्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय वाशिम, राष्ट्रीय सेवा योजना व महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या संयुक्त सहकार्यातून ३१ डिसेंबरपर्यंत मद्यपान विरोधी पंधरवडा अभियान.महिलांच्या हाताने दारुच्या प्रतिकात्मक बाटलीला चपलांची माळ घालून व्यसनाला बदनाम करण्याचा अनोखा कार्यक्रम १ जानेवारीला घेतला जाणार आहे.

वाशिम - श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय वाशिम, राष्ट्रीय सेवा योजना व महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या संयुक्त सहकार्यातून ३१ डिसेंबरपर्यंत मद्यपान विरोधी पंधरवडा अभियान राबविले जात असून, २३ डिसेंबरला वाशिम शहरातून भव्य जनजागृतीपर रॅली काढली जाणार आहे. 

नववर्षाच्या स्वागताला युवा पिढी सज्ज असताना नव्या वर्षात युवा पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्याचा एक प्रयत्न म्हणून सदर पंधरवडा १५ डिसेंबरपासून राबविला जात आहे. या पंधरवड्यादरम्यान नववर्षाच्या प्रारंभी क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन तसेच महिलांच्या हाताने दारुच्या प्रतिकात्मक बाटलीला चपलांची माळ घालून व्यसनाला बदनाम करण्याचा अनोखा कार्यक्रम १ जानेवारीला घेतला जाणार आहे. या अभियानादरम्यान व्यसनमुक्तीचा संकल्प केलेल्या व्यक्तींकडून जमा झालेली गुटखा, तंबाखु, सिगारेट, बिडी इत्यादीची होळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर करण्यात येईल. दरम्यान २३ डिसेंबर रोजी शहरातून जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. व्यसनापासून दुर राहण्याचा संकल्प या नवीन वर्षात सर्वांनी करावा. या मद्यपान विरोधी पंधरवडा अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष पी.एस. खंदारे, प्रा. यु.एस. जमधाडे, प्रा.ए.पी. राऊत, प्रा.ए.टी. वाघ, प्रा. पी.एन. संधानी, माधव अंभोरे, डॉ. नरेश इंगळे, डॉ. मंगेश राठोड, डॉ. विक्रम चौधरी, डॉ. रामकृष्ण कालापाड, राजु दारोकार, प्रा. सुभाष अंभोरे, हरिदास बनसोड, अजय ढवळे, विनोद पट्टेबहादुर, विनोद तायडे, राजु सरतापे, गजानन धामणे, दिनकर बोडखे, प्रा. उन्मेश घुगे, अ‍ॅड. दिपाली सांबर, अ‍ॅड. विनोद आठोर, सुनिल कांबळे, प्रा. डी.एस. गोरे, गजानन भोयर, दत्तराव वानखेडे, संतोष कांबळे, शाहीर संतोष खडसे, शाहीर विश्वनाथ इंगोले, गायीका सुशीला घुगे, सुभाष सावळे, सुनिल सावळे, राहुल बलखंडे, कुसुम सोनुने, निलेश भोजने, प्रा. अशोक वाघ, राम श्रृंगारे, समाधान भगत, समाधान सावंत, वसंत मोरे, पी.बी. वानखेडे, भगवान खडसे, दिलीप वानखेडे, अमोल वानखेडे, जनार्धन भालेराव आदींनी केले.

Web Title: A public awareness rally will come from Washim city under anti-drinking fortnightly campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम