‘आत्मा’अंतर्गत लोकसहभागीय सूक्ष्म नियोजन कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:40 AM2021-02-10T04:40:15+5:302021-02-10T04:40:15+5:30
‘आत्मा’अंतर्गत लोहसहभागीय सूक्ष्म नियोजन कार्यक्रमात ‘पूर्वतयारी कार्यशाळा’ घेण्यासह या उपक्रमाबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी शेतकऱ्यांच्या सहभागाने गावात प्रभात फेरी काढली ...
‘आत्मा’अंतर्गत लोहसहभागीय सूक्ष्म नियोजन कार्यक्रमात ‘पूर्वतयारी कार्यशाळा’ घेण्यासह या उपक्रमाबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी शेतकऱ्यांच्या सहभागाने गावात प्रभात फेरी काढली जात आहे, तसेच प्रौढ व वयस्कर व्यक्तींबरोबर चर्चा करून गावासंबंधी ऋतुचक्र, समायरेषा व परिस्थिती विश्लेषण माहिती घेऊन चर्चा करण्यात येत आहे. कारंजा तालुक्यातील वाघोळा येथे सोमवारपासून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ९ फेब्रुवारी रोजी
सकाळी प्रकल्प व सूक्ष्म नियोजन प्रक्रियेबद्दल जनजागृती होण्यासाठी प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर गावातील लोकांनी संपूर्ण गावातील संसाधनांचा ‘संसाधन नकाशा’ काढण्यात आला. यात समूह साहाय्यक ज्ञानेश्वर दराडे यांनी नकाशा वाचन केले व गावातील प्रौढ व वयस्कर व्यक्तींबरोबर चर्चा करून गावासंबंधी ऋतुचक्र व परिस्थिती विश्लेषणाची माहिती घेऊन चर्चा करण्यात आली. नंतर गावकऱ्यांबरोबर शिवार फेरी व विहीर निरीक्षण करण्यात आले. या प्रसंगी कृषी पर्यवेक्षक संतोष मिसाळ, कृषी साहाय्यक मंगेश सोळंके, समूह साहाय्यक ज्ञानेश्वर दराडे, गावचे सरपंच भारत भगत, स्वयंसेवक चेतन राऊत व कुलदीप ठाकरे तसेच ग्राम कृषी संजीवनी समितीचे सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा प्रकल्प कक्ष वाशिम व सूक्ष्म नियोजन समन्वयक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
===Photopath===
090221\09wsm_1_09022021_35.jpg
===Caption===
आत्मा अंतर्गत लोकसहभागीय सूक्ष्मनियोजन कार्यक्रम