वाशिम जिल्ह्यात ११ मार्चला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 03:20 PM2018-03-10T15:20:13+5:302018-03-10T15:20:13+5:30

वाशिम :  शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओची लस देण्यासाठी रविवार, ११ मार्च २०१८ रोजी सकाळी  ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे.

Pulse Polio vaccination campaign on March 11 in Washim district! | वाशिम जिल्ह्यात ११ मार्चला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम!

वाशिम जिल्ह्यात ११ मार्चला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम!

Next
ठळक मुद्दे११ मार्च रोजी सकाळी ८ वाजतापासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बुथच्या ठिकाणी बालकांना पोलिओची लस दिली जाईल.ग्रामीण भागात ८१९, तर नागरी भागात १२५ अशा एकुण ९४४ पल्स पोलिओ लसीकरण बुथची स्थापना करण्यात आली आहे. बुथवर काम करण्यासाठी ग्रामीण भागात २१५१ नागरी भागासाठी ३६५ असे एकुण २५१६ मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे.


वाशिम :  शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओची लस देण्यासाठी रविवार, ११ मार्च २०१८ रोजी सकाळी  ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. नागरिकांनी आपल्या पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. यापूर्वी पोलिओची लस दिली असली तरीही पुन्हा पोलिओची लस घेणे आवश्यक असल्याचे कळविण्यात आले आहे.
पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेकरिता ग्रामीण भागात ८१९, तर नागरी भागात १२५ अशा एकुण ९४४ पल्स पोलिओ लसीकरण बुथची स्थापना करण्यात आली आहे. बुथवर काम करण्यासाठी ग्रामीण भागात २१५१ नागरी भागासाठी ३६५ असे एकुण २५१६ मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे. मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामीण भागात १६४ व नागरी भागासाठी २५ असे एकुण १८९ पर्यवेक्षकाची नियुक्ती करण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने कळविले आहे.
११ मार्च रोजी सकाळी ८ वाजतापासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बुथच्या ठिकाणी बालकांना पोलिओची लस दिली जाईल तसेच विट भट्ट्या, गिट्टी खदान, मजुरांच्या वस्त्यामधील बालकांना लसीकरण करण्यासाठी ग्रामीण भागात २४, तर नागरी भागात ७ अशा एकुण ३१ मोबाईल टीम कार्यरत राहणार आहेत. याशिवाय प्रवासातील बालकांना लसीकरण करण्यासाठी रेल्वे स्टेशन, बस स्टँड, बस थांबे, चौफुलीच्या ठिकाणी एकूण १०५ ट्रान्सिट टीम २ पाळीमध्ये उपलब्ध राहणार आहेत. १३ ते १५ मार्च या कालावधीत ग्रामीण भागात तसेच १३ ते १७ मार्च या कालावधीत शहरी भागात घरोघरी सर्वेक्षण करून बुथवर न आलेल्या बालकांना लसीकरण केले जाणार आहे.

Web Title: Pulse Polio vaccination campaign on March 11 in Washim district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम