भाजीपाल्यासोबत डाळही सामान्यांच्या अवाक्याबाहेर; हरभरा डाळीने भूक भागविली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:25 AM2021-07-23T04:25:04+5:302021-07-23T04:25:04+5:30
वाशिम : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे हाल हाेत असून, दैनंदिन स्वयंपाकगृहात लागत असलेल्या डाळीसह भाजीपाल्याचेही भाव वाढल्याने सर्वसामान्यांना घरखर्च करताना ...
वाशिम : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे हाल हाेत असून, दैनंदिन स्वयंपाकगृहात लागत असलेल्या डाळीसह भाजीपाल्याचेही भाव वाढल्याने सर्वसामान्यांना घरखर्च करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पुढे सणासुदीचे दिवस असल्याने डाळीच्या भावात वाढ हाेण्याची शक्यता असल्याने संसार कसा चालवावा, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
सध्याच्या घडीला सर्व डाळींचे भाव १०० रुपयांच्या घरात गेले आहेत. केवळ हरभरा डाळीचे भाव ७० रुपये किलाे दिसून येत आहेत. यामुळे हरभरा डाळीपासून हाेत असलेल्या पदार्थांचा जास्त वापर केला जात आहे.
............
...म्हणून डाळ महागली!
वाढते पेट्राेल व डिझेलच्या भावामुळे ट्रान्सपाेर्ट खर्चात वाढ झाली आहे. याचा परिणाम किराणा मालावरही दिसून येत आहे. डाळींच्या भावासह इतर किराणा मालाच्या दरातही वाढ झाल्याचे व्यावसायिक नागेश काळे यांनी सांगितले.
दरवर्षी शेतकऱ्यांच्या पिकांचे हाेणारे नुकसान व कमी उत्पन्नामुळेही डाळींच्या भावात वाढ झाल्याचे दिसून येते.
..........
...म्हणून भाजीपाला कडाडला!
पावसाळ्याच्या दिवसात भाजीपाल्याचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेते. दरवर्षी पावसाळ्यात भाजीपाल्याचे भाव कडाडलेच असतात, परंतु या वेळी पेट्राेल-डिझेल दराच्या भावात माेठ्या प्रमाणात वाढ झाल्याने भाजीपालाही माेठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे.
....
सर्वसामान्यांचे हाल
सरकारने किमान जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढणार नाहीत याबाबत खबरदारी घ्यावी. परिवार चालविताना माेठी कसरत करावी लागते.
- सुरेखा खानझाेडे, वाशिम
.......
भाजीपाल्याचे भाव वाढले तर डाळीचा वापर वाढला, आता डाळीचेही भाव वाढले. शासनाने याबाबत विचार करणे गरजेचे आहे.
- दीपाली इंगळे, वाशिम