वाशिम जिल्ह्यात कडधान्याचा पेरा वाढणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 02:09 PM2018-04-20T14:09:40+5:302018-04-20T14:09:40+5:30
वाशिम - गतवर्षी राज्यभरात कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण झाल्याने शेतकºयांना मोठा फटका बसला त्यातच यंदा राज्यात बोगस बीटी बियाणे दाखल झाल्याची शंका खुद्द कृषी विभागानेच व्यक्त केली असून, काही जिल्ह्यात हे बियाणे आढळूनही आले आहे.
वाशिम - गतवर्षी राज्यभरात कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण झाल्याने शेतकºयांना मोठा फटका बसला त्यातच यंदा राज्यात बोगस बीटी बियाणे दाखल झाल्याची शंका खुद्द कृषी विभागानेच व्यक्त केली असून, काही जिल्ह्यात हे बियाणे आढळूनही आले आहे. या पृष्ठभूमीवर यंदा वाशिम जिल्ह्यात तूर, मुग, उडिद या पिकांचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. कृषीतज्ज्ञांनीही असा अंदाज व्यक्त केला असून, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने कृषी संचालकांकडे पाठविण्यात आलेल्या नियोजन अहवालांतच कडधान्याच्या पेºयाचे वाढीव क्षेत्रावर नियोजन के ल्याचे नमूद करण्याम आले आहे.
अमरावती विभागात गतवर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला. त्यामुळे शेतकºयांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागलेच शिवाय निकृष्ट बियाण्यांनीही शेतकºयांचा घात केला. प्रामुख्याने बोंडअळीचा विभागातील शेतकºयांना फटका बसला. कपाशीच्या पिकाला न मिळणारे अपेक्षीत दर, तसेच वातावरणात होत असलेल्या बदलामुळे आधीच अमरावती विभागातील शेतकºयांनी या पिकाकडे पाठ केली आहे. बीटी बियाण्यांची घटलेली क्षमता शेतकºयांना भेडसावत असतानाच बोगस बीटी बियाणे राज्यात दाखल झाल्याच्या चर्चेने शेतकरी अधिकच धास्तावले आहेत. अर्थात, आधीच नैसर्गिक संकटे पिच्छा पुरवित असताना त्यात कपाशीची पेरणी करून अधिक नुकसान कशाला ओढवून घ्यायचे, अशी मानसिकता शेतकºयांची झाली आहे. त्यामुळेच यंदा कडधान्याचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्याच्या कृषी विभागानेही यंदाच्या पेरणी नियोजनात कपाशीचे क्षेत्र कमी केले आहे, तर तुर, मुग आणि उडिदाचे क्षेत्र वाढविले आहे. वाशिम जिल्ह्यात कपाशीच्या पेरणीचे नियोजन मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल ७४२१ हेक्टरने कमी करण्यात आले आहे, तर तुरीचे क्षेत्र ४४८५ हेक्टरने वाढविण्यात आले आहे. मुगाच्या पेरणीचे नियोजनही गतवर्षीच्या तुलनेत यंदा २५५५ हेक्टरने अधिक करण्यात आले, तर उडिदाचे क्षेत्र ८४ हेक्टर वाढविण्यात आले आहे. अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यातही यापेक्षा कमीअधिक प्रमाणात कडधान्याचा पेरा वाढण्याचा अंदाज कृषीतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.