‘कोहळा’ शेतीचा प्रयोग यशस्वी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:29 AM2021-05-28T04:29:53+5:302021-05-28T04:29:53+5:30
अवर्षण, अतिवृष्टी, सिंचनाच्या साधनाचा अभाव या विपरीत परिस्थितीमधून मानोरा तालुक्यातील काही कष्टकरी शेतकऱ्यांनी प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर शेतीत नवनवीन प्रयोग ...
अवर्षण, अतिवृष्टी, सिंचनाच्या साधनाचा अभाव या विपरीत परिस्थितीमधून मानोरा तालुक्यातील काही कष्टकरी शेतकऱ्यांनी प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर शेतीत नवनवीन प्रयोग सुरू केल्याचे दिसून येते. बेलोरा शेतशिवारातील राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या शेतात खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांमध्ये पिकांचे व्यवस्थित नियोजन करून कृषी विभागाच्या सल्ल्याने अनेक शेतकरी उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुंगशीराम उपाध्ये यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात उन्हाळी कोहळ्याची लागवड केलेली असून, आजरोजी एक हेक्टर क्षेत्रामधून दोन ते तीन क्विंटल कोहळे मानोरा आणि आजूबाजूच्या बाजारपेठेमध्ये प्रतिकिलो १५ ते १८ रुपये दराने विकतात. उन्हाळी कोहळ्याच्या या शेतीवरच ते विसंबून राहिले नाहीत, तर त्यांनी कोहळ्याच्या या शेतीमध्ये आंतरपीक म्हणून १० गुंठ्यांत सांभाराची लागवड करून आतापर्यंत १५ हजार रुपयांच्या वर सांभाराची विक्री केली आहे.