पुरामुळे खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:28 AM2021-07-15T04:28:09+5:302021-07-15T04:28:09+5:30
शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिके पेरलेली आहेत. या पुरामुळे बहुतांश पिके खरडून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या ...
शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिके पेरलेली आहेत. या पुरामुळे बहुतांश पिके खरडून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर्षी सोयाबीन बियाणांची किंमत मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करणे सुद्धा कठीण आहे तसेच मार्केटमध्ये सोयाबीन बियाणेसुद्धा उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी आहेत. संबंधित भागातील मंडल अधिकारी व तलाठी यांच्याकडून खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे करून देण्यात यावेत, याची मागणी करण्यात आली. जिल्हा जनविकास आघाडीचे तसेच पंचायत समिती सभापती सुभाष खरात, पंचायत समिती सदस्य संदीप भानुदास धांडे, रवी आढाव, अशोकराव कुलाळ, रवीचंद्र बोंडे, परसराम वानखेडे आदींनी १३ जुलैरोजी रिसोड तहसीलदार यांना यासंदर्भात निवेदन दिले.
०००
शासनाकडे अहवाल पाठवावा
संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून, पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत व्हावी, याकरिता पंचनामे शासनस्तरावर पाठविण्यात यावे, अशी मागणी सुभाष खरात यांच्यासह सदस्यांनी केली.