कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:38 AM2021-03-07T04:38:50+5:302021-03-07T04:38:50+5:30
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिल्यानंतर सर्व संबंधित यंत्रणांमार्फत नियोजनबद्ध प्रयत्न सुरू करण्यात ...
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिल्यानंतर सर्व संबंधित यंत्रणांमार्फत नियोजनबद्ध प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व दुकानांवर कारवाई करण्यासाठी नगरपरिषदेमार्फत २ पथके स्थापन करण्यात आली आहेत, तसेच पोलीस विभाग, ग्रामस्तरीय समितीमार्फतही दंडात्मक कारवाया केल्या जात आहेत.
नगरपरिषदेच्या पथकांनी मास्कचा वापर न करणाऱ्या २४ व्यक्तींवर, तसेच कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन प्रकरणी एका दुकानावर दंडात्मक कारवाई केली. यामधून १७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पोलीस विभागाने मास्क न वापरणाऱ्या ४५ व्यक्तींवर शनिवारी दंडात्मक कारवाई केली. यामध्ये २२ हजार ५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. ग्रामीण भागात मास्क न वापणाऱ्या व्यक्तींकडून शनिवारी दिवसभरात ११ हजार २५० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.