मास्क न वापरणाऱ्या २०० जणांवर दंडात्मक कारवाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 10:57 AM2020-05-11T10:57:29+5:302020-05-11T10:57:39+5:30

गत १५ दिवसात राबविण्यात आलेल्या मोहिमेत एकूण २०० जण दोषी आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Punitive action against 200 people who do not wear masks! | मास्क न वापरणाऱ्या २०० जणांवर दंडात्मक कारवाई !

मास्क न वापरणाऱ्या २०० जणांवर दंडात्मक कारवाई !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांनी चेहºयावर मास्क किंवा रुमाल बांधणे जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी यापूर्वीच बंधनकारक केले आहे. परंतू, अनेकजण याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गत १५ दिवसात राबविण्यात आलेल्या मोहिमेत एकूण २०० जण दोषी आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, चेहºयावर मास्क किंवा रुमाल बांधावा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने केलेल्या आहेत. या सूचनांची काही जण अंमलबजावणी करतात तर अनेकजण अंमलबजावणी करीत नसल्याने शेवटी जिल्ह्यातील चार नगर परिषद व दोन नगर पंचायतने कारवाईची मोहिम हाती घेतली. वाशिम, रिसोड, कारंजा व मंगरूळपीर या चार नगर परिषद आणि मानोरा व मालेगाव या दोन नगर पंचायत मिळून गत १५ दिवसांत जवळपास २०० जण मास्क न लावता शहरात फिरत असल्याचे आढळल्याने त्यांच्याविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली.
नागरिकांनी चेहºयावर मास्क किंवा रुमाल बांधावा, याबाबत सुरूवातीला सहाही शहरांमध्ये जनजागृतीही करण्यात आली. त्यानंतर मास्क किंवा रूमाल न लावणाºया नागरिकांविरूद्ध कारवाईची मोहिम सुरू केली. वाशिम शहरातही पाटणी चौक, अकोला नाका, भाजी मार्केट यासह प्रमुख चौकातून विनामास्क प्रवास करणाºया नागरिकांवर कारवाई करण्यात आली. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नसल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, मास्कचा नियमित वापर करावा, शक्यतोवर विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.
 
रिसोड शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना सर्वांना दिलेल्या आहेत. जे व्यापारी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणार नाही, त्यांच्याविरूद्ध कारवाई केली जाईल. १० मे रोजी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणारे तसेच मास्क न लावणाºयाविरूद्ध कारवाई केली.
- गणेश पांडे, मुख्याधिकारी, नगर परिषद रिसोड.

 

Web Title: Punitive action against 200 people who do not wear masks!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.