५४ जणांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:27 AM2021-06-22T04:27:33+5:302021-06-22T04:27:33+5:30
........... मांगूळझनक येथे आरोग्य तपासणी मोहीम वाशिम : रिसोड तालुक्यातील मांगूळझनक येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी ...
...........
मांगूळझनक येथे आरोग्य तपासणी मोहीम
वाशिम : रिसोड तालुक्यातील मांगूळझनक येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी आणखी एका जणाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. गावात नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे.
..........
शाळेकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून
वाशिम : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर २८ जून नंतर विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू होणार की नाही, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे. गत वर्षभरापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थी देखील घरात राहून कंटाळले असल्याचे दिसून येते.
..........
कार्ली परिसरात विजेचा लपंडाव
वाशिम : कार्ली परिसरातील गावांमध्ये विद्युत पुरवठा अधून-मधून खंडित होत असल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत. रात्रीच्या वेळीही ही समस्या जाणवत आहे. याकडे महावितरणने लक्ष पुरवावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
.............
पर्यटन स्थळांच्या विकासाची प्रतीक्षा
वाशिम : जिल्ह्यातील डव्हा, पोहरादेवी, शिरपूर, तऱ्हाळा यासह अन्य पर्यटन स्थळे व तीर्थक्षेत्रांना अद्याप विकासाची प्रतीक्षा लागून आहे. पर्यटन स्थळांचा विकास होण्यासाठी शासनाने भरघोष निधी पुरवावा, अशी मागणी भाविकांमधून होत आहे.