६४ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:25 AM2021-07-23T04:25:33+5:302021-07-23T04:25:33+5:30
रोजगार सेवकांचे मानधन प्रलंबित वाशिम : राेजगार सेवकांचे मानधन वारंवार प्रलंबित असल्याने रोजगार सेवकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. ...
रोजगार सेवकांचे मानधन प्रलंबित
वाशिम : राेजगार सेवकांचे मानधन वारंवार प्रलंबित असल्याने रोजगार सेवकांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
पाणंद रस्ता कामाच्या चौकशीची मागणी
वाशिम : तालुक्यातील ब्रम्हा ते वारला दरम्यान पाणंद रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या कामाची चौकशी करावी. तोपर्यंत देयकाची अदायगी करू नये, अशी मागणी ब्रम्हा येथील शेतकऱ्यांनी संबंधितांकडे केली आहे.
पाणंद रस्त्यांची कामे करण्याची मागणी
वाशिम : पाणंद रस्त्यांचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी वाशिम, मालेगाव व रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांनी वारंवार केली होती. मात्र, अद्यापही बहुतांश पाणंद रस्त्यांचा प्रश्न निकाली निघाला नाही.
रस्त्यावरील गटारामुळे अपघाताची भीती
वाशिम : उंबर्डाबाजार-जांब या रस्त्याची दयनीय कायमच आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे वाहनधारकांना अडचणी येत असल्याचे दिसले. यामुळे अपघात घडण्याची भीती आहे.
रस्त्यावर पडली काटेरी झाडे
माहुली : माहुली येथून जवळच असलेल्या चिखली-धानोरा रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून, या रस्त्यावर वादळवाऱ्याने काटेरी झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे चालकांना अडचणी येत आहेत. संबंधितांनी लक्ष द्यावे.