पाण्याचा अपव्यय झाल्यास दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:37 AM2021-05-22T04:37:19+5:302021-05-22T04:37:19+5:30
रिसोड शहरात नागरिकांना बाराही महिने अखंडित पाणीपुरवठा केला जातो. नळाद्वारे पाणी सोडल्यानंतर काही नागरिक वाहन धुणे, रस्त्यावर पाणी सोडणे, ...
रिसोड शहरात नागरिकांना बाराही महिने अखंडित पाणीपुरवठा केला जातो. नळाद्वारे पाणी सोडल्यानंतर काही नागरिक वाहन धुणे, रस्त्यावर पाणी सोडणे, नालीमध्ये पाणी सोडणे, नळाला तोटी न बसविता पाण्याचा अपव्यय करताना आढळत आहेत. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्याकरिता नगर परिषद प्रशासनाने आता ठोस पाऊल उचलले असून, पाण्याचा अपव्यय होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितास पहिल्यांदा ५०० रुपये, दुसऱ्यांदा हजार रुपये दंड आकारण्यात येईल. याउपरही नियमाचे पालन न केल्यास नळ कनेक्शन तोडून टाकण्याची कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती नगर परिषद प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. तथापि, शहरात पाणीटंचाईचे संकट उद्भवू नये, यासाठी नगर परिषदेने पाणीबचतीचा मार्ग अवलंबिला असून, जनता त्यास कितपत प्रतिसाद देते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.