पाण्याचा अपव्यय झाल्यास होणार दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:41 AM2021-05-23T04:41:03+5:302021-05-23T04:41:03+5:30
अडाेळ प्रकल्पावरून रिसोड शहराला पाणीपुरवठा होतो. जल हेच जीवन आहे, या उक्तीप्रमाणे पाण्याची बचत करणे ही महत्त्वपूर्ण बाब ...
अडाेळ प्रकल्पावरून रिसोड शहराला पाणीपुरवठा होतो. जल हेच जीवन आहे, या उक्तीप्रमाणे पाण्याची बचत करणे ही महत्त्वपूर्ण बाब आहे. या उद्देशाने पाणीपुरवठा सुरू असताना शहरामध्ये काही नागरिक वाहन धुणे, रस्त्यावर पाणी सोडणे, नालीमध्ये पाणी सोडणे, नळाला ताेटी न बसविणे, विनाकारण पाण्याचा अपव्यय करणे, पाण्याचे लोट रस्त्यावर येणे, घरगुती पाण्याच्या टाकीमधून पाण्याचा अपव्यय होणे, परगावी गेल्यास नळ सुरू असणे या प्रकाराला आळा घालण्याकरिता नगरपालिका प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून, पाण्याचा अपव्यय केल्यास, पहिल्यांदा पाचशे रुपये, दुसऱ्यांदा हजार रुपये, तिसऱ्यांदा नळ कनेक्शन बंद करणे अशी कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती नगर परिषद प्रशासनाने दिली.
०००
पाण्याची बचत करणे ही काळाची गरज आहे. पाण्याचे महत्त्व जाणून घेणे व पाण्याचा अपव्यय टाळणे याला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी पाणी बचतीचा मार्ग स्वीकारावा व नगर परिषद प्रशासनाला सहकार्य करावे.
- गणेश पांडे
मुख्याधिकारी
नगरपरिषद रिसोड