७ हजारांपैकी केवळ १२६१ शेतकऱ्यांच्या उडिदाची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 06:03 PM2018-12-31T18:03:05+5:302018-12-31T18:03:25+5:30
वाशिम: जिल्ह्यात यंदा दोन महिन्यांपासून उडिद, मुगाच्या शासकीय खरेदीला सुरुवात करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात यंदा दोन महिन्यांपासून उडिद, मुगाच्या शासकीय खरेदीला सुरुवात करण्यात आली. या खरेदी प्रक्रियेसाठी ७०३८ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली असली तरी, चालू आठवड्यापर्यंत केवळ जिल्ह्यातील सहा केंद्रांवर मिळून केवळ १२६१ शेतकºयांच्या उडिदाची खरेदी होऊ शकली आहे. त्यामुळे या खरेदी प्रक्रियेला वेग देण्याची मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे.
जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला असला तरी, त्यात नियमितता नव्हती. त्यातच आॅगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर शेतमाल खरेदीत उडिद आणि मुगाला अपेक्षीत भाव मिळत नसल्याने शेतकरी हताश झाले होते. शासनाने मुगाला ६९७५ रुपये प्रति क्विंटल, तर उडिदाला ५६०० रुपये प्रति क्विंटल दर जाहीर केले असतानाही बाजारात उडिदाला प्रति क्विंटल ४८००, तर मुगाला प्रति क्विंटल ५००० रुपयांपर्यंत दर मिळत असल्यामुळेच शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकºयांकडून सुरू होती. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आली. तत्पूर्वी ३१ आॅक्टोबरपर्यंतच्या मुदतीत जिल्ह्यातील ७०२४ शेतकºयांनी उडिदाच्या विक्रीसाठी खरेदी विक्र ी संस्थांकडे नोंदणी केली होती. यात मंगरुळपीर आणि कारंजा येथे व्हीसीएमएसच्या खरेदी प्रक्रियेंतर्गत अनुक्रमे ३४८१ आणि १५०५ शेतकºयांनी नोंदणी केली होती, तर जिल्हा पणन अधिकारी कार्यालयांतर्गत सुरू असलेल्या खरेदी प्रकियेत रिसोड तालुक्यातील १२०. मानोरा तालुक्यातील ५१५ आणि मालेगाव तालुक्यातील ११९५ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी केवळ १२६१ शेतकºयांच्या ७४३८ क्विंटल उडिदाची खरेदी पाच केंद्रावर झाली आहे. अद्यापही ५७७७ शेतकºयांच्या उडिदाची मोजणी शिल्लक आहे. थंडीच्या दिवसांत या शेतकºयांना रोज आपल्या मालाची मोजणी करून घेण्यासाठी खरेदी केंद्रांकडे वाºया कराव्या लागत आहेत.