'ई नाम' योजनेत १७४ क्विंटल तूर, हरभरा खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:19 AM2021-03-04T05:19:04+5:302021-03-04T05:19:04+5:30
रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तूर व हरभरा या शेतमालाच्या लिलावाकरिता ई-नाम योजनेमध्ये ऑनलाईन पद्धतीने बोली लावण्यात आली. ...
रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तूर व हरभरा या शेतमालाच्या लिलावाकरिता ई-नाम योजनेमध्ये ऑनलाईन पद्धतीने बोली लावण्यात आली. यामध्ये तुरीचे १७ लॉट व हरभऱ्याचे १४ लॉट पाडण्यात आले. यावेळी १७ खरेदीदारांनी बोली लावली. त्यानंतर विजेता यादी प्रकाशित करण्यात आली. त्यात तुरीच्या १४ लॉटला (८६ क्विंटल) ६६३० ते ६८२५ रुपये प्रती क्विंटलचा दर मिळाला. तसेच हरभऱ्याच्या १३ लॉटला (८८ क्विंटल) ४२०० ते ४८५० रुपये प्रती क्विंटलचा दर देण्यात आला. दरम्यान, बाजार समितीमध्ये दररोज पाच अडत्यांकडे आलेल्या तूर व हरभरा या शेतमालाची खरेदी ई नाम योजनेमार्फत करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी या योजनेस शेतकरी, अडते व व्यापाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. योजनेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा उपनिबंधक सुधीर मेत्रेवार, प्रशासक रवी गडेकर, सहायक निबंधक एकनाथ काळबांडे, सचिव विजय देशमुख, मंडी विश्लेषक निखील देशमुख यांनी पुढाकार घेतला.