वाशिम जिल्ह्यात चार दिवसांत २२५० क्विंटल कापूस खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 05:01 PM2020-11-25T17:01:22+5:302020-11-25T17:01:33+5:30
९० शेतकऱ्यांचा २२५०.२४ क्विंटल कापूस मोजून घेण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात गत चार दिवसांपूर्वी सुरू झालेल्या शासकीय कापूस खरेदी प्रक्रियेंतर्गत २३ नोव्हेंबरपर्यंत अनसिंग आणि मंगरुळपीर येथे मिळून ९० शेतकऱ्यांचा २२५०.२४ क्विंटल कापूस मोजून घेण्यात आला आहे.
जिल्ह्यात सीसीआयच्यावतीने शासकीय कापूस खरेदीला १९ नोव्हेंबरपासून सुरुवात करण्यात आली. या कापूस खरेदीसाठी अनसिंग आणि मंगरुळपीर येथील बाजार समितीत २२ ऑक्टोबरपासून कापूस उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. या नोंदणी प्रक्रियेंतर्गत मंगरुळपीर येथील बाजार समितीत ९०३ शेतकºयांनी कापूस विकण्यासाठी नोंदणी केली, तर वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत अनसिंग येथे २३ नोव्हेंबरपर्यंत ५७९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी मंगरुळपीर येथील सीसीआयच्या खरेदी केंद्रावर २५ शेतकऱ्यांचा ६६५.५९ क्विंटल कापूस मोजून घेण्यात आला, तर अनसिंग येथे ६५ शेतकºयांचा १५८४. ६५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. या खरेदी प्रक्रियेसाठी अद्यापही शेतकऱ्यांची नोंदणी सुरू असून, कुठल्याही शेतकºयाला या ठिकाणी नोंदणी करता येणार असल्याने संख्या वाढून जिल्ह्यातील शेतकºयांची मात्र पंचाईत होणार आहे.