मानोरा बाजार समितीत २६ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 03:34 PM2019-11-03T15:34:23+5:302019-11-03T15:34:33+5:30

मानोरा : येथिल कृषि उत्पन्न बाजार समितिमधे या हंगामात आजपर्यन्त २६ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे.

Purchase of 26 Thousand quintals of soyabeans in Manora Market Committee | मानोरा बाजार समितीत २६ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी

मानोरा बाजार समितीत २६ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : येथिल कृषि उत्पन्न बाजार समितिमधे या हंगामात आजपर्यन्त २६ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. भाव चांगले मिळतात ,काटा वेळेवर होतो व विकलेल्या मालाचे पैसे तात्काळ मिळतात म्हणून बाहेर जिल्ह्यातील शेतकरी येथे माल विक्रिस पसंती देतात.
सोयाबीन वगळता इतर धान्य सुद्धा मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते. खरेदीदार व्यापारी, आडते हमाल यांचेही चांगले सहकार्य , बाजार समितिचे संचालकांतर्फे राबविण्यात येत असलेले शेतकरी हिताचे धोरण या खरेदीमागील फलीत असल्याचे बोलल्या जाते.
येथील बाजार समिति मधे ए टीडीएम कार्यान्वित आहे. या मशीनमधून सात बारा, फेरफार, आठ अ, हक्क नोंदणी, पेरे पत्रक, कोतवाल बुकची नक्कल ही कागद पत्रे कधीही काढता येतात. त्यासाठी केवळ २० रु.फी द्यावी लागते हे शेतकऱ्यांना फायदयाचे ठरत असून बाजार समितिमधे माल विक्रीसाठी येणाº्या शेतकº्यांना येथे केवळ ५ रूपयात जेवण दिल्या जाते. जेवण सुद्धा चांगल्या प्रतिचे आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत.महाराष्ट्र राज्य कृषि पनन मंडल पुणे यांच मार्फत बाजार समितिमधे शेतमाल तारण कर्ज योजना सुरु आहे. बाजार भावाच्या ७५ टक्के कर्ज उपलब्ध आहे. व्याज दर केवल ६ टक्के आहे.कोणत्याही प्रकारचे गोदाम भाड़े घेतले जात नाही, अर्ज केला त्याच दिवशी कर्ज मिळते. दर वर्षी ८० लक्ष रुपये कर्ज वाटप केले जाते.म्हणून शेतकारी यानी योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन सभापती गोविंद चव्हान यानी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Purchase of 26 Thousand quintals of soyabeans in Manora Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.