अडीच हजार शेतकऱ्यांच्या ४२ हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 03:16 PM2018-05-28T15:16:11+5:302018-05-28T15:16:11+5:30

वाशिम - हमीभावानुसार हरभऱ्याची विक्री व्हावी म्हणून जिल्ह्यातील ११ हजार ३८८ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली. त्यापैकी आतापर्यंत २५१८ शेतकºयांची ४२ हजार ३९८ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. 

The purchase of 42 thousand quintals of gramm 2.5 thousand farmers | अडीच हजार शेतकऱ्यांच्या ४२ हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी

अडीच हजार शेतकऱ्यांच्या ४२ हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात रिसोड, वाशिम, मालेगाव, कारंजा, मानोरा व मंगरूळपीर येथे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. आतापर्यंत २५१८ शेतकºयांकडून ४२ हजार ३९८ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. जवळपास ८०० शेतकऱ्यांचे चुकारे प्रलंबित आहेत.

वाशिम - हमीभावानुसार हरभऱ्याची विक्री व्हावी म्हणून जिल्ह्यातील ११ हजार ३८८ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली. त्यापैकी आतापर्यंत २५१८ शेतकºयांची ४२ हजार ३९८ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. 

हरभरा या शेतमालाची खरेदी किमान आधारभूत किंमतीने व्हावी यासाठी जिल्ह्यात रिसोड, वाशिम, मालेगाव, कारंजा, मानोरा व मंगरूळपीर येथे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. आॅनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून या खरेदी केंद्रावर  हरभऱ्याची खरेदी केली जाते. आतापर्यंत २५१८ शेतकºयांकडून ४२ हजार ३९८ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. जवळपास ८०० शेतकऱ्यांचे चुकारे प्रलंबित आहेत. वाशिम येथील खरेदी केंद्रावर ३६६८ शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी झाली असून, आतापर्यंत १७२३ शेतकऱ्यांची २९ हजार ७६० क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. रिसोड येथे १३३९ शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी झाली असून, आतापर्यंत १०७ शेतकऱ्यांची १ हजार ९३९ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. मालेगाव येथे १४५३ शेतकऱ्यांची आॅनलाईन नोंदणी झाली असून, आतापर्यंत २८७ शेतकऱ्यांची ४ हजार ८०३ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. मानोरा येथे ११६० शेतकऱ्यांची आॅनलाईन नोंदणी झाली असून, आतापर्यंत २७६ शेतकऱ्यांची ४ हजार १५२ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. मंगरूळपीर येथे ३०९४ शेतकऱ्यांची आॅनलाईन नोंदणी झाली असून, आतापर्यंत ७३ शेतकऱ्यांची १ हजार ४५ क्विंटल हरभºयाची खरेदी करण्यात आली. कारंजा येथे ७०४ शेतकऱ्यांची आॅनलाईन नोंदणी झाली असून, आतापर्यंत ५२ शेतकऱ्यांची ६९८ क्विंटल हरभºयाची खरेदी करण्यात आली. 

Web Title: The purchase of 42 thousand quintals of gramm 2.5 thousand farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.