वाशिम जिल्ह्यात नाफेडच्या मुग खरेदीचा मुहूर्तच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 04:37 PM2018-11-11T16:37:55+5:302018-11-11T16:38:56+5:30
वाशिम: नाफेडच्यावतीने सप्टेंबरच्या अखेरीस जिल्ह्यात मुग आणि उडिदाच्या खरेदीसाठी नोंदणी सुरू केली आणि ले; परंतु आता दीड महिना उलटला तरी, मुगाची खरेदी एक किलोही कोणत्याच केंद्रावर झालेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: नाफेडच्यावतीने सप्टेंबरच्या अखेरीस जिल्ह्यात मुग आणि उडिदाच्या खरेदीसाठी नोंदणी सुरू केली आणि ले; परंतु आता दीड महिना उलटला तरी, मुगाची खरेदी एक किलोही कोणत्याच केंद्रावर झालेली नाही. नाफेडकडे मुगाची विक्री करण्यासाठी नोंदणी करणाºया पाच तालुक्यातील ५३६ शेतकºयांना या खरेदीचा मुर्हूत निघण्याची प्रतिक्षा आहे.
बाजारात यंदाच्या शेतमालास नगण्य भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गाकडून शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. या पृष्ठभूमीवर शासनाच्यावतीने ३० सप्टेंबरपासून हमीभावाने खरेदीसाठी शेतकºयांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याच्या सुचना देण्यात आल्या. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात उडिद आणि मुगाच्या खरेदीसाठी शेतकºयांची नोंदणी सुरू करण्यात आली. तथापि, नोंदणी प्रक्रिया पूर्ण होऊनही खरेदी केंद्र सुरू होण्याची चिन्हे दिसत नसल्याने नोंदणी करणाºया शेतकºयांत रोषाचे वातावरण होते. या संदर्भात जिल्हा उपनिबंधकांकडे निवेदन सादर करून नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणीही करण्यात येत होती. या मागणीनंतर जिल्ह्यात १५ आॅक्टोबरपासून मंगरुळपीर आणि कारंजा येथे मुग, उडिदाची खरेदी नाफेडमार्फत सुरू करण्यात आली. त्यानंतरही वाशिम, मालेगाव, मानोरा आणि रिसोड येथेही खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. नाफेडकडे मुगाची विक्री करण्यासाठी रिसोड येथील १, मानोरा येथील २१, मालेगाव येथील १५२, मंगरुळपीर येथील १२२ आणि कारंजा येथील २४० शेतकºयांनी नोंदणी केली; परंतु यातील एकाही शेतकºयाकडून मुगाची खरेदी अद्यापही होऊ शकलेली नाही. मुगाची खरेदी न होण्यामागचे कारणही नाफेडकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.
उडिदाची खरेदीही नगण्य
जिल्ह्यात नाफेडकडे उडिदाची विक्र ी करण्यासाठी जिल्ह्यातील ६७८४ शेतकºयांनी नोंदणी केली होती. यामध्ये रिसोड १३, मानोरा ५९४, मालेगाव १२४९, मंगरुळपीर ३४५८ आणि कारंजा येथील १४७० शेतकºयांचा समावेश होता. त्यापैकी १११ शेतकºयांकडून केवळ ६४८.७० क्विंटल उडिदाची खरेदी करण्यात आली. यामध्ये मंगरुळपीर येथील ३४ आणि कारंजा येथील ७७ शेतकºयांचा समावेश आहे, अर्थात इतर तीन ठिकाणी उडिदाची खरेदीच होऊ शकली नसल्याचेही स्पष्ट होत आहे.