रिसोड बाजार समितीत सोयाबीनची कमी दराने खरेदी; शेतकऱ्यांचा राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 03:01 PM2020-02-25T15:01:04+5:302020-02-25T15:01:31+5:30
कमी दर मिळाल्यामुळे गवळी यांनी रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विजय देशमुख यांच्याकडे तक्रार केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत २४ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या सोयाबीनची कमी दराने खरेदी होत असल्याचे पाहून शेतकºयांनी आक्रमक पवित्रा घेतला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बाजार समिती प्रशासनाने मध्यस्थी करून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
लेहणी येथील शेतकरी श्रीकृष्ण गणेश गवळी यांनी ४० क्विंटल सोयाबीन विकण्यासाठी रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत आणले होते. बाजार समित्यांमध्ये साधारण ३८५० ते ४००० या दरम्यान प्रती क्विंटल दर आहेत. रिसोड येथे शेतमालाची हर्राशी झाल्यानंतर श्रीकृष्ण गवळी यांच्या सोयाबीनला कमी दर मिळाल्याने शेतकº्याचा राग अनावर झाला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये शेतकºयांनी खरेदीदारांच्या नावाने राडा केल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. सोयाबीन चांगल्या प्रतीचे असूनही कमी दर मिळाल्यामुळे गवळी यांनी रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विजय देशमुख यांच्याकडे तक्रार केली. परंतु बाजार समितीची परिस्थिती बघता संबंधित शेतकºयांच्या सोयाबीनला प्रति क्विंटल मागे पंचवीस रुपये वाढ देऊ अशी ग्वाही देशमुख यांनी दिली. दर वाढल्यामुळे शेतकºयांचे काही प्रमाणात समाधान झाले.
दरम्यान अन्य बाजार समितीच्या तुलनेत रिसोड बाजार समितीत शेतमालाला कमी दर मिळत असल्याने श्रीकृष्ण गवळी यांच्यासह शेतकºयांनी रोष व्यक्त केला. (तालुका प्र्रतिनिधी)