वाशिम जिल्ह्यात नाफेड तूर खरेदीचा मुहुर्त हुकला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 01:41 PM2018-02-02T13:41:18+5:302018-02-02T13:43:04+5:30
वाशिम : सन २०१७-१८ या हंगामासाठी नाफेडमार्फत तुरीची खरेदी १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने जाहिर केले होते.
वाशिम : सन २०१७-१८ या हंगामासाठी नाफेडमार्फत तुरीची खरेदी १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने जाहिर केले होते. वाशिम जिल्ह्यात मात्र २ फेब्रुवारीपर्यंतही तूर खरेदी सुरू झाली नसून, सोमवार, ५ फेब्रुवारीपासून खरेदी केंद्र सुरू होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वाशिम जिल्ह्यात वाशिम, रिसोड, मालेगाव अनसिंग येथे खरेदी केंद्रे उघडण्यात येणार असून, जास्तीत जास्त शेतकºयांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करून तूर खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन विभागामार्फत करण्यात आले होते. नवीन तूर बाजारात आलेली आहे. मात्र, हमीभाव मिळत नसल्याने शेतकºयांची आर्थिक लूट होत आहे. शासनाने ५४५० असा प्रतिक्विंटल हमीभाव तूरीला दिलेला आहे. बाजार समित्यांमध्ये ४२०० ते ४६०० रुपयादरम्यान तूरीला बाजारभाव मिळत आहे. शेतकºयांना हमीभाव मिळावा यासाठी वाशिम जिल्ह्यात चार ठिकाणी नाफेडमार्फत तूरीची खरेदी १ फेब्रुवारीपासून सुरू होणार होती. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे ही खरेदी अद्याप सुरू होऊ शकली नाही. ५ फेब्रुवारीपासून हमीभावाने खरेदी सुरू होईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. हमीभावाने तूरीची खरेदी होण्यासाठी शेतकºयांना शासनाच्या संकेतस्थळावर आॅनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. शेतकºयांनी आधारकार्डची छायाकिंत प्रत, सुरू असलेल्या बँक खात्याचे पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत अथवा त्या खात्याचा रद्द केलेला धनादेश (चेकबुक), सात बारा उतारा आदी कागदपत्रे आणणे आवश्यक आहे. शेतकºयांना खरेदीचे चुकारे बँक खात्यात आॅनलाईन होणार असल्यामुळे बँक खात्याची नोंदणी अचूक करावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले.