वाशिम जिल्हा परिषदेत शुद्ध पाण्याची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 01:19 PM2018-11-18T13:19:33+5:302018-11-18T13:19:53+5:30
वाशिम : दीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर १७ नोव्हेंंबर रोजी जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचाºयांसाठी पिण्याच्या शूद्ध पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : दीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर १७ नोव्हेंंबर रोजी जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचाºयांसाठी पिण्याच्या शूद्ध पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत या सेवेचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत अधिकारी, कर्मचाºयांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नव्हती. परिणामी, विकतचे पाणी घेण्याची वेळ आली होती. आॅटोमधून ‘कॅन’ने पाणी आणले जात होते. कर्मचारीवर्ग ‘लोकवर्गणी’तून पाण्यासाठी खर्च करीत होते. अधिकारी, कर्मचाºयांची ही गैरसोय लक्षात घेता, जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी पिण्याच्या पाण्याची कायमस्वरुपी व्यवस्था करण्यासाठी पुढाकार घेतला. जवळपास तीन लाख रुपये निधीची तरतूद करून प्रशासकीय इमारतीवर पाणी शुद्धीकरण प्रणाली बसविण्यात आली आहे. ताशी ५०० लिटर क्षमतेची पाणी शुद्धीकरण प्रणाली कार्यान्वित केली आहे. एक हजार लिटर क्षमतेच्या दोन साठवन टाक्या बसविण्यात आल्या असून, येथून कॅनद्वारे संबंधित विभागात शूद्ध पाणी नेता येणार आहे. या सेवेचा शुभारंभ १९ नोव्हेंबरला जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, सभापती सुधीर गोळे, यमुना जाधव, विश्वनाथ सानप, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडनीस यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी व कर्मचाºयांची उपस्थिती होती.