राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेचे खेळाडू राज्यस्तरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 07:55 PM2017-10-12T19:55:58+5:302017-10-12T20:01:47+5:30

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे विद्यमाने, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशीम व्दारा बुलडाणा येथे विभागीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.  

Queen Laxmibai girls school at the state level | राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेचे खेळाडू राज्यस्तरावर

राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेचे खेळाडू राज्यस्तरावर

Next
ठळक मुद्देमैदानी क्रीडा स्पर्धा आदिती गोरे व गायत्री चौधरीचे घवघवित यश

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम  : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे विद्यमाने, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशीम व्दारा बुलडाणा येथे विभागीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.  या स्पर्धामध्ये स्थानिक राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. १७ ते १९  वर्षा आतील वयोगटात इयत्ता नववीची अदिती प्रल्हाद गोरे हिने ३ किलोमीटर धावणे व क्रॉस कंट्री  या  दोन्ही स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच इयत्ता आठविची विद्यार्थीनी गायत्री गणेश चौधरी  हिने ३ किलोमिटर चालण्याच्या स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले. त्या अनुषंगाने दोन्ही खेळाडूंचे स्वागत व सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती कुलकर्णी, उपमुख्याध्यापक सुरेश खरावन, पर्यवेक्षिका शिला वजीरे यांनी केला. शाळेचे क्रीडा शिक्षक विष्णू इढोळे यांचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभले. नागपूर येथे होणाºया राज्यस्तरीय स्पर्धेत खेळाडूंच्या पुढील यशस्वी वाटचालीकरीता उपस्थितांनी शुभेच्छा दिल्यात . यावेळी संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. मधुकरराव अनसिंगकर, उपाध्यक्ष दत्तात्रय देशमुख, सचिव डॉ. प्रदीप फाटक, सहसचिव डॉ. सुनिता घुडे, सदस्य धनंजय खरे, विजयाताई देशपांडे आदींन्ची उपस्थिती लाभली होती. 

Web Title: Queen Laxmibai girls school at the state level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.