प्रश्न निकाली निघत नसल्याचे पाहून ग्रामपंचायतला ठोकले कुलुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 05:43 PM2018-12-12T17:43:50+5:302018-12-12T17:45:01+5:30

भर जहॉगीर (वाशिम) : जागेची नोंदी घेण्यास विलंब करणे यासह अन्य प्रश्न निकाली निघत नसल्याचे पाहून भर जहॉगीर येथील ग्रामपंचायत कार्यालयाला सत्यनारायण फुके यांनी १२ डिसेंबर रोजी कुलूप ठोकले.

question is not being solved; villagers lock the grampanchayat | प्रश्न निकाली निघत नसल्याचे पाहून ग्रामपंचायतला ठोकले कुलुप

प्रश्न निकाली निघत नसल्याचे पाहून ग्रामपंचायतला ठोकले कुलुप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भर जहॉगीर (वाशिम) : जागेची नोंदी घेण्यास विलंब करणे यासह अन्य प्रश्न निकाली निघत नसल्याचे पाहून भर जहॉगीर येथील ग्रामपंचायत कार्यालयाला सत्यनारायण फुके यांनी १२ डिसेंबर रोजी कुलूप ठोकले.
स्थानिक ग्रामपंचायतमार्फत विविध विकास काम मार्गी लागणे गावकºयांना अपेक्षीत आहे. येथील ग्रामपंचायतमार्फत कोणत्याही कामास प्रचंड विलंब होत असल्याचा ठपका ठेवत भर जहॉगीर येथील सत्यनारायण फुके यांनी १२ डिसेंबर रोजी सकाळी कार्यालयाला कुलुप ठोकले. गावात विविध समस्या निर्माण झालेल्या आहेत. जागेच्या नोंदी घेण्यास विलंब होत आहे. सांडपाणी रस्त्यावर येत आहे. काही पथदिवे बंद राहत आहेत यासह अन्य समस्यांनी गावकरी त्रस्त आहेत. पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही. विकास कामे होत नसल्याने ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्याचे प्रकार अलिकडच्या काळात वाढीस लागल्याचे दिसून येते. ३ ते ४ महिन्यांपासून जागेची नोंदी होत नाही. वारंवार चकरा मारूनही याकडे कुणीच लक्ष देत नसल्याचे पाहून शेवटी संयमाचा बांध फुटल्याने ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले, असे फुके यांनी सांगितले.

Web Title: question is not being solved; villagers lock the grampanchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.