वाशिम जिल्ह्यात बलून बॅरेजेस उभारण्याचा प्रश्न अडकला लालफितशाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 03:18 PM2019-03-26T15:18:40+5:302019-03-26T15:19:11+5:30

बलून बॅरेजेसचा प्रश्न लालफितशाहीत अडकण्यासोबतच इतर सिंचन प्रकल्पांची कामेही अपूर्णावस्थेत आहेत.

The question of setting up Balloon Barrages in Washim district is stuck | वाशिम जिल्ह्यात बलून बॅरेजेस उभारण्याचा प्रश्न अडकला लालफितशाहीत!

वाशिम जिल्ह्यात बलून बॅरेजेस उभारण्याचा प्रश्न अडकला लालफितशाहीत!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष कमी करण्यासाठी अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करणे आवश्यक आहे. मात्र, याकडे राज्यशासनाचे दुर्लक्ष होत असून जिल्ह्यात तीन ठिकाणी उभारल्या जाणाºया बलून बॅरेजेसचा प्रश्न लालफितशाहीत अडकण्यासोबतच इतर सिंचन प्रकल्पांची कामेही अपूर्णावस्थेत आहेत.
जिल्ह्यात बोरव्हा, घोटा शिवणी आणि सत्तर सावंगी अशा तीनठिकाणी बलून पद्धतीच्या बॅरेजेसची कामे केली जाणार असून त्याचा सुधारित प्रस्ताव जलसंपदा विभागाकडून शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. मात्र, याबाबत शासनस्तरावरून कुठलीच ठोस हालचाल झालेली नाही. याशिवाय वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाºया एकबुर्जी प्रकल्पाच्या सांडव्याची उंची एक मीटरने वाढविण्याचा प्रश्नही प्रलंबित आहे. जिल्ह्यातील खडकी, गोंडेगाव, पांगराबंदी, इंगलवाडी, स्वासीन, पळसखेड आदी प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करणे, सिंचन अनुशेष निर्मुलन कार्यक्रमांतर्गत माळेगाव संग्राहक, शेलगाव संग्राहक व रापेरी संग्राहक तलावांच्या प्रस्तावास मान्यता देण्याची बाब देखील शासनस्तरावर प्रलंबित असून सद्य:स्थितीत सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि त्यानंतर होणाºया निवडणुकीमुळे ही कामे सद्यातरी सुरू होण्याबाबत अनिश्चितता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: The question of setting up Balloon Barrages in Washim district is stuck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.