वाहतूक नियमनाचा प्रश्न झाला गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:26 AM2021-07-09T04:26:28+5:302021-07-09T04:26:28+5:30

............... सुरू झालेल्या कूपनलिका पडताहेत पुन्हा बंद वाशिम : यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळे उन्हाळ्यात कोरड्या ...

The question of traffic regulation became serious | वाहतूक नियमनाचा प्रश्न झाला गंभीर

वाहतूक नियमनाचा प्रश्न झाला गंभीर

Next

...............

सुरू झालेल्या कूपनलिका पडताहेत पुन्हा बंद

वाशिम : यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळे उन्हाळ्यात कोरड्या झालेल्या बहुतांश कूपनलिका सुरू झाल्या; मात्र नंतर पावसाने दडी मारल्याने काही कूपनलिका बंद पडत आहेत.

....................

वाशिम शहर होतेय कोरोनामुक्त

वाशिम : शहरात दैनंदिन कोरोना संसर्गाने बाधित आढळणाऱ्या रुग्णांमध्ये गेल्या काही दिवसांत परिणामकारक घट झालेली आहे. यावरून शहर हळूहळू कोरोनामुक्त होत असल्याचे दिसून येत आहे.

..............

वृक्षलागवडीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

वाशिम : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट ठाण मांडून आहे. यामुळे अधिकांश शासकीय उपक्रम ठप्प असून वृक्षलागवडीकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. सामाजिक वनीकरण विभागानेही याबाबत उदासीनता बाळगली आहे.

..............

सात गावांतील विजेचा प्रश्न मिटणार

वाशिम : केशवनगर येथील विद्युत उपकेंद्रानजीक ३.२५ मेगावॅट क्षमतेच्या वीज निर्मितीचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून सात गावांमधील विजेचा प्रश्न निकाली निघणार आहे.

................

मालेगावात रात्रीची गस्त वाढली

मालेगाव : रात्रीच्या सुमारास होणाऱ्या भुरट्या चोऱ्यांवर नियंत्रण मिळविण्याकरिता पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपासून रात्रीची गस्त वाढविण्यात आल्याचे दिसून येत आहे.

.................

तीबल सीट वाहतूक; पोलिसांची कारवाई

वाशिम : स्थानिक पाटणी चाैकात शहर वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तळ ठोकून बुधवारी दुपारच्या सुमारास प्रामुख्याने तीबल सीट वाहतूक करणाऱ्या दुचाकी वाहनांवर कारवाई केली.

............

रस्त्याची दुरवस्था, दुरुस्तीची मागणी

वाशिम : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून कच्चा स्वरूपातील या रस्त्याला खड्डे पडले आहेत. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

.............

एटीडीएम मशीन कार्यान्वित करा

वाशिम : जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील, बाजार समिती आदीठिकाणी शेतकऱ्यांची सोय व्हावी, यासाठी बंद असलेल्या एटीडीएम मशीन कार्यान्वित कराव्या, अशी शेतकऱ्यांमधून होत आहे.

.............

पदे रिक्त असल्याने मनेरगाची कामे ठप्प

वाशिम : रिसोड तालुक्यातील महसूल विभागात महत्त्वाची अनेक पदे रिक्त आहे. त्याचा थेट परिणाम मनरेगाच्या कामांवर झाला असून ही कामे गत काही महिन्यांपासून ठप्प झाली आहेत.

............

शिवरायांच्या पुतळ्यास जलाभिषेक

वाशिम : शहरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास वर्षभरातील ३६५ दिवस जलाभिषेक करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यानुसार, गुरुवारी सकाळी हा उपक्रम राबविण्यात आला.

................

ऑक्सिजन सिलिंडरचे दर वधारले

वाशिम : मध्यंतरी ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला होता. हा प्रश्न आता निकाली निघाला; मात्र सिलिंडरच्या दरात दुप्पटीने वाढ झाली असून गरजू रुग्णांचे नातेवाईक हैराण झाले आहेत.

........................

बाजारपेठेतील गर्दी नियंत्रणाबाहेर

वाशिम : नागरिकांची गैरसोय टळावी, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची मुभा दिली; मात्र याच कालावधीत बाजारपेठेतील गर्दी नियंत्रणाबाहेर जात असल्याचे दिसून येत आहे.

.......................

वाशिम शहरात स्वच्छता अभियान

वाशिम : शहरातील विविध प्रभागांमधील कचरा नियमित उचलून नेण्यासह सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांच्या स्वच्छतेकडे न.प.ने विशेष लक्ष पुरविणे सुरू केले आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून गुरुवारी आययूडीपीत स्वच्छता करण्यात आली.

...............

थकबाकी अदा करण्याचे आवाहन

वाशिम : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठा व विद्युत पथदिव्यांचे कोट्यवधी रुपये थकीत आहेत. ही रक्कम अदा करून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता आर.जी. तायडे यांनी केले.

Web Title: The question of traffic regulation became serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.