शेतक-यांच्या पिकांचे सर्व्हेक्षण त्वरीत करा!

By admin | Published: March 18, 2017 03:11 AM2017-03-18T03:11:06+5:302017-03-18T03:11:06+5:30

कृषिमंत्र्यांचे जिल्हाधिका-यांना आदेश; अवकाळी पाऊस.

Quickly survey the farmers' crops! | शेतक-यांच्या पिकांचे सर्व्हेक्षण त्वरीत करा!

शेतक-यांच्या पिकांचे सर्व्हेक्षण त्वरीत करा!

Next

वाशिम, दि. १७-१६ मार्च रोजी वाशिम जिल्हय़ातील कारंजा, मानोरा, मंगरुळपीरसह इतर गावांमध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे परिसरातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. याबाबत कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी १७ मार्च रोजी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या शेतीचे सर्वेक्षण करून तत्काळ मदत देण्याची विनंती केली. यावर कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी तत्काळ जिल्हाधिकारी वाशिम यांना नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण करून सादर करण्याचे निर्देश दिले.
१६ मार्च रोजी जिल्हय़ातील कारंजा, मानोरा, मंगरुळपीरसह इतर गावात अवकाळी पाऊस व गारपिटीने मोठे थैमान घातले. यामध्ये संत्रा, अंबा, हरभरा, गहू, कांदा व भाजीपाल्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले असून सदर बाब कृषिमंत्री फुंडकर यांच्या निदर्शनास आमदार राजेंद्र पाटणी यांनी आणून दिली. यावर लवकरच नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण करून शेतकर्‍यांना आर्थिक मदत उपलब्ध होईल, अशी ग्वाहीसुद्धा कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आमदार राजेंद्र पाटणी यांना दिली.

Web Title: Quickly survey the farmers' crops!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.