ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:11 AM2021-01-08T06:11:05+5:302021-01-08T06:11:05+5:30
नैसर्गिक संकटांनी गतवर्षी शेतकऱ्यांचा पिच्छा पुरविल्यानंतर यंदाच्या वर्षीही सुरुवातीपासूनच निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांवर होत आहे. त्यात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ ...
नैसर्गिक संकटांनी गतवर्षी शेतकऱ्यांचा पिच्छा पुरविल्यानंतर यंदाच्या वर्षीही सुरुवातीपासूनच निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांवर होत आहे. त्यात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. सद्य:स्थितीत रब्बी हंगामातील हरभरा, गहू, करडई, रब्बी ज्वारी आणि मक्याचे पीक बहरत असताना या वातावरणामुळे या पिकांवर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. त्यात प्रामुख्याने हरभरा पीक संकटात सापडले असून, या पिकावर विविध किडींसह मररोगाचा प्रादुर्भावही दिसू लागला आहे. त्यामुळे पिकाची फुले व घाटे गळून पडत आहेत. शिवाय गहू, मका आणि रब्बी ज्वारी या तृणवर्गीय पिकांवरही ढगाळ वातावरणाचा परिणाम होत असल्याने शेतकरीवर्गात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच गत खरीप हंगामातील नुकसानाच्या मदतीपासून आणि पीकविम्याच्या लाभापासून शेतकरी वंचित असताना आता रब्बी पिके संकटात सापडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
===Photopath===
050121\05wsm_1_05012021_35.jpg
===Caption===
ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके संकटात