पुरेसे पाणी उपलब्ध असल्यासच रब्बी पेरणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 01:25 PM2017-10-04T13:25:44+5:302017-10-04T13:26:10+5:30
वाशिम : जमीनीत पुरेसा ओलावा नसताना तसेच संरक्षीत सिंचनाची सुविधा नसतांना पेरणी केल्यास उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट येऊ शकते, तसेच ही बाब आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखी नाही त्याकरिता पुरेसे पाणी उपलब्ध असल्यासच रब्बीची पेरणी करण्याचे आवाहनजिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गावसाने यांनी केले आहे.जिल्हयाचे सरासरी पर्जन्यमान ७९८ मी.मी. असून आजमितीस ५८८ मी.मी. पाऊस झालेला असून तो सरासरी पावसाच्या 73 टक्के आहे. जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे धरणामध्ये सुध्दा फक्त २६ टक्के पाणीसाठा झालेला असून भूगभार्तील पाण्याच्या पातळीत विशेष वाढ झालेली नाही. जिल्ह्यात नदीनाले व ओढे यामध्येही विशेष पाणी साठलेले दिसून येत नाही. तसेच विहीरी/बोअरवेलच्या पाण्यामध्ये म्हणावी अशी वाढ दिसून येत नाही. अशा परिस्थितीमध्ये गव्हासारखी बागायती पिकाची पेरणी घ्यावयाची झाल्यास ज्यांच्याकडे पुरेसे पाणी उपलब्ध आहे अशा शेतकºयांनीच गव्हासारख्या बागायती पिकाची पेरणी करावी. हरबºयांची पेरणी ही वेळेच्या आत म्हणजेच कोरडवाहू पेरणी ३० आॅक्टोंबर व बागायतची पेरणी १५ नोव्हेंबरपर्यंतच पुर्ण करावी. गहू हरभरा या पिकांपेक्षा कमी पाणी लागणारे रब्बी हंगामातील करडई हें एक पिक आहे. अशा परिस्थितीमध्ये १५ आॅक्टोंबर पर्यंत करडई या पिकाची पेरणी फायदेशीर ठरु शकते. या वर्षीच्या अपुºया पर्जन्यमानामुळे जमीनीत पुरेसा ओलावा उपलब्ध नाही. तरी शेतकरी बांधवांना विशेष दक्षता घेण्यासाठी तसेच हंगामामध्ये जमीनीत पुरेसा ओलावा नसताना तसेच संरक्षीत सिंचनाची सुविधा नसतांना पेरणी केल्यास उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट येऊ शकते, तसेच ही बाब आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखी नाही हेही लक्षात घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गावसाने यांनी केले आहे.