गैरमार्गाने लर्नींग लायसन्स प्राप्त करणारे कारवाईच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 11:52 AM2021-06-19T11:52:24+5:302021-06-19T11:52:37+5:30

learning license : शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी मूळ उमेदवारांऐवजी इतर अनधिकृत व्यक्ती देत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

On the radar of action for illegally obtaining a learning license | गैरमार्गाने लर्नींग लायसन्स प्राप्त करणारे कारवाईच्या रडारवर

गैरमार्गाने लर्नींग लायसन्स प्राप्त करणारे कारवाईच्या रडारवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : नागरिकांच्या सोयीसाठी परिवहन विभागात शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी व शिकाऊ अनुज्ञप्ती परवाना (लर्निंग लायसन्स) ऑनलाईन पद्धतीने जारी करण्याची प्रणाली १४ जूनपासून कार्यान्वित करण्यात आली; मात्र काही ठिकाणी शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी मूळ उमेदवारांऐवजी इतर अनधिकृत व्यक्ती देत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तथापि, गैरमार्गाने अनुज्ञप्ती प्राप्त केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात येणार असून त्यांना अनुज्ञप्ती मिळविण्यासाठी कायमस्वरूपी अपात्र ठरेल, अशी कारवाई करण्यात येणार असल्याचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद यांनी कळविले आहे.
लोकाभिमुख सुविधांचा गैरवापर होऊ नये, यासाठी संगणकीय प्रणालीत आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. या प्रणालीचा गैरवापर करून लर्निंग लायसन्स प्राप्त करणाऱ्या अर्जदाराची तपासणी करण्यात येवून गैरमार्गाने शिकाऊ अनुज्ञप्ती प्राप्त केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरूद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच मोटार वाहन कायदा १९८८ कलम १९ (इ) अन्वये अनुज्ञप्ती प्राप्त करण्यास कायमस्वरूपी अपात्र ठरेल, अशा प्रकारची कारवाई करण्यात येईल. गैरमार्गाने शिकाऊ अनुज्ञप्ती प्राप्त करण्यास सहाय्य करणाऱ्या अनधिकृत व्यक्ती, मध्यस्थ, मोटार ड्रायव्हिंग स्कूल, सायबर कॅफे यांच्याविरुद्धदेखिल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल. मोटार ड्रायव्हिंग स्कूल यांची अनुज्ञप्ती रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे सय्यद यांनी सांगितले. नागरिकांनी गैरप्रकार करून शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) प्राप्त करून देणाऱ्या व्यक्ती, संस्थांची माहिती  कळविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
 

Web Title: On the radar of action for illegally obtaining a learning license

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.