मृत मातेला कवटाळून माकडाच्या पिल्लाचा आक्रोश
By admin | Published: January 13, 2017 06:18 PM2017-01-13T18:18:55+5:302017-01-13T18:18:55+5:30
गरुळपीर येथे झाडावरून पडल्यामुळे मृत पावलेल्या माकडीणीचा मृत्यू झाला. यावेळी आपली आई उठत नसल्याचे पाहून तिच्या पिल्लाने मृतदेह कवटाळून आक्रोश केला.
Next
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 13 - मंगरुळपीर येथे झाडावरून पडल्यामुळे मृत पावलेल्या माकडीणीचा मृत्यू झाला. यावेळी आपली आई उठत नसल्याचे पाहून तिच्या पिल्लाने मृतदेह कवटाळून आक्रोश केला. आईला उठवण्याचे तो सर्व प्रकारे प्रयत्न करू लागला. मात्र आपली आई सोडून गेल्याचे या पिल्लाला काही समजेना. जवळपास 2 तास हे माकड त्याच्या आईला कवटाळून होते.
मागील वर्षभरापासून शहर आणि गावलगतच्या शेतशिवारात माकडांचे कळप फिरत आहेत. झाड-पाला खाऊन जगणारी ही माकडे झाडाच्या फांद्यावर इकडून तिकडेसारखी उड्या मारत असतात. शहरातून जाणा-या मानोरा मार्गावरही काही दिवसांपासून माकडांचा कळप वावरत आहे. शुक्रवार 13 जानेवारी रोजी त्यातील एका माकडीणीचा झाडावरून पडल्याने मृत्यू झाला.
त्यावेळी हे लहान पिल्लूही तिच्या कुशीत होते. सुदैवाने ते पिल्लू बचावले. आपली आई उठत नाही, हे पाहून तिच्या पिल्लाने आक्रोश सुरू केला. ते दृश्य पाहून येणा-या-जाणा-यांचेही डोळे पाणावत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दीपक खोडके यांनी त्या पिल्लाला आईपासून दूर करत त्याचा सांभाळ करण्याची जबाबदारी स्वीकारली व त्याला घरी नेले.