राहेरीच्या पूलावरील वाहतूक राहणार बंद
By admin | Published: March 18, 2017 03:19 PM2017-03-18T15:19:31+5:302017-03-18T15:19:31+5:30
पुलाचे बेअरींग दुरूस्तीचे काम करण्याकरीता पुलाचे स्लॅब उचलणे व हलविणे गरजेचे असल्यामुळे या पूलावरील वाहतूक बंद असणार आहे.
सकाळी 8 ते सायं 5 वाजेपर्यंत वाहतूक बंद
बुलडाणा - जालना-सिंदखेड राजा-मेहकर-मालेगांव रस्त्यावर असलेल्या राहेरी
गावाजवळच्या खडकपूर्णा नदीवरील मोठ्या पुलाच्या दुरूस्तीचे काम सुरू
होणार आहे. पुलाचे बेअरींग दुरूस्तीचे काम करण्याकरीता पुलाचे स्लॅब
उचलणे व हलविणे गरजेचे असल्यामुळे या पूलावरील वाहतूक बंद असणार आहे. या
मार्गावरील सदर वाहतूक जालना-देऊळगांव राजा-दे.मही- खैरव-मलकापूर
पांग्रा-बिबी-सुलतानपूर- मेहकर या मागार्ने वळविण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे मेहकर-सिंदखेड राजा- जालना रस्त्यावरील वाहतूक
मेहकर-सुलतानपूर-बिबी-मलकापूर पांग्रा- खैरव झ्र देऊळगाव मही- दे.राजा-
जालना मार्गे वळविण्यात येणार आहे. या मार्गावरील जड वाहतूक
पूर्वीप्रमाणे जालना-दे.राजा-चिखली-मेहकर आणि
जालना-दे.राजा-चिखली-खामगांव या मागार्ने सुरू राहणार आहे.