जुगार अड्ड्यावर छापा; २.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 03:00 PM2019-04-03T15:00:57+5:302019-04-03T15:01:11+5:30
वाशिम : मालेगाव तालुक्यातील पांगराबंदी येथील अवैध वरली मटका, जुगार अड्ड्यावर छापा टाकून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २ एप्रिल रोजी सायंकाळी २.३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मालेगाव तालुक्यातील पांगराबंदी येथील अवैध वरली मटका, जुगार अड्ड्यावर छापा टाकून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २ एप्रिल रोजी सायंकाळी २.३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पांगराबंदी ता. मालेगाव येथे अवैध वरली मटका, जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २ एप्रिल रोजी पांगरा बंदी शेतशिवारात चालणाºया या जुगार अड्ड्यावर छापा मारला. यावेळी आरोपी गजानन मारोती लठ्ठाड रा. पांगराबंदी, श्रीराम दयाराम आडे, जनार्धन भिका इंगळे दोन्ही रा. देवठाणा खांब यांच्याकडून वरली मटका जुगार साहित्य, मोबाईल व रोख २६ हजार १०० रुपये असा एकूण दोन लाख ३५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपीविरूद्ध १२ अ जुगार अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक भगवान पायघन, सहायक पोलीस उपनिरीक्षक भगवान गावंडे यांच्यासह कर्मचारी व चमूने पार पाडली.