कारंजात जुगारावर धाड; ११ आरोपींविरूद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 04:50 PM2018-10-16T16:50:46+5:302018-10-16T16:51:21+5:30
स्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी पळशी झाशी येथील नागरीकांनी ढोल ताशांच्या गजरात तहसीलदारांना निवेदन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शहरातील इंदिरा नगर परिसरात चालणाºया जुगार अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १५ आॅक्टोबर रोजी धाड टाकून ११ आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांनी दिली.
मिळालेल्या गोपनिय माहितीवरून कारंजातील जुगार अड्डयावर धाड टाकण्यात आली. यावेळी त्याठिकाणी ७० ते ८० लोक जुगार खेळत होते. मात्र, पोलिसांची चाहुल लागताच संबंधितांनी पळ काढला. पोलिसांनीही पाठलाग करून त्यातील नितीन गावंडे, अफ्रोज शहा मुनीर शहा, कय्यूम पप्पू पप्पूवाले, चाँद खेतीवाले, लक्ष्मण चव्हाण, देवराव चावके, गोपाल अघम, गुलशन पवार, गजानन रोकडे, जापानसिंग अंद्रेले, अनमोलसिंग अंद्रेले अशा ११ जणांना ताब्यात घेतले. सहायक पोलिस उपनिरीक्षक भगवान गावंडे यांच्या फिर्यादीवरून संबंधितांविरूद्ध कलम १२ (अ) जुगार अॅक्टअन्वये कारंजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.